पाच नंबर साठवण तलावाच्या धास्तीने विरोधकांचा वॉक आऊट – संदीप वर्पे

पाच नंबर साठवण तलावाच्या धास्तीने विरोधकांचा वॉक आऊट – संदीप वर्पे

कोरम पूर्ण, सभा वैध,२६ पैकी २३ विषय मंजूर

वृत्तवेध ऑनलाईन |Thu17 Sep20 ,
By: Rajendra Salkar, 14.00

कोपरगाव : निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्यात गायत्री कंपनीच्या मार्फत पाच नंबर साठवण तलावाचे खोदायचे काम करणाऱ्या आमदार आशुतोष काळे यांच्याकडून पाच नंबर साठवण तलाव झाला तर शहराचा पाणी प्रश्न सुटेल या धास्तीने सेना-भाजपच्या विरोधी नगरसेवकांनी ऑनलाईन सर्वसाधारण सभेतून वॉकआऊट केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वर्पे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. कालची सभा  वैध असून २६ पैकी तीन विषय तहकूब ठेवण्यात आले असून ते २३ विषय मंजूर झाले असल्याचा दावा   पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर वर्पे यांनी  केला.

ऑनलाइन सभा हा शासनाचा आदेश होता. कालच्या सभेतील सेना-भाजप नगरसेवकांचे कृत्य म्हणजे शासन निर्णयाला आव्हान देणारे होते. मग त्यांनी केलेला खोटा कांगावा हा विषय क्रमांक सहा हाणून पाडण्याचे नियोजन होता होते का ? असा खोचक सवालही वर्पे यांनी त्या वेळी केला

संदिप वर्पे म्हणाले, मुळात ३८ कोटीची पाणी योजना ४२ कोटी कोणामुळे व कशी झाली ? पुढे ती ४९ कोटीची झाली. १८ कोटीची बिले यांच्या काळात निघाली आता फक्त आठ कोटीची बिले अदा केली असल्याचे सांगितले. आहे असे आहे तर मग त्याचे वॉटर ऑडिट घेण्यात तुम्हाला काय अडचण आहे ? दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर वर्पे म्हणाले, याबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी नासिक गव्हर्मेंट कॉलेज मार्फत वॉटर ऑडिट झाल्याचे माहिती देऊन नगराध्यक्षांची पाठराखण करणाऱ्या वर्पे यांनी प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. परंतु पत्रकारांनी ऑडिट झाले तर मग शेरा काय आला ? असा पाठपुरावा केला असता वर्पे यांनी यावर मात्र मौन धारण केले.
निसर्ग कन्सल्टींग नासिक सोडून गेली नाही तर बेकायदेशीर ठरावाद्वारे यांची मुदत वाढ रद्द केली पुण्याला गेला आहे गुड न्यायालयात गेला आहे त्याला एक कोटी रुपये देण्याची वेळ आली तर याला जबाबदार कोण पाच नंबर साठवण तलावासाठी सल्लागार धुळे कंपनीची नेमणूक करण्यात येणार आहे हे सर्व सोपस्कर नियमाने झालेले आहेत कधीकाळी धुळे कंपनीची शिफारस करणारे आज हीच मंडळी धुळे कंपनीला नावे ठेवू लागली आहे अशी टीकाही वर्पे यांनी केली.

६७ गुंठ्याच्या आरक्षण उठवून श्रीखंड खाणार असल्याचा आरोप आमच्यावर करणाऱ्यांनी १९ नोव्हेंबर २०१९ च्या सभेत दहा एकर आरक्षण उठवून मग काय आम्रखंड खाल्ले का ? क्रीडांगणाच्या आरक्षणाबाबत नगरपालिका जर सर्वोच्च न्यायालयात जात असेल तर त्याला आमची काहीच हरकत नाही. रस्त्यासाठी आमदार आशितोष काळे यांनी सहा कोटीचा निधी आणला हार्डी कोणत्या रस्त्यासाठी वापरण्यात येणार आहे अशी माहिती विचारली असता ते म्हणाले शहरातील मुख्य रस्त्याचे साठी हा निधी वापरण्यात येणार आहे यावर हे जे मुख्य रस्ते झाले आहेत ते कधी व कधी झाले याची माहिती प्रसिद्ध करून त्याची देखभाल-दुरुस्ती काय झाले ? शहरातील डांबरीकरण व काँक्रिटीकरण झालेले रस्ते महिन्याभराच्या आंत उखडले गेले, याला जबाबदार कोण ? ज्यांनी ही कामे केली त्यांच्यावर कोणती कारवाई झाली ? आधी या प्रश्नांची उत्तरे जनतेला द्या मगच आमदार आशुतोष काळे यांनी आणलेले सहा कोटी रुपये खर्ची टाकून हे रस्ते करण्यात यावे केवळ काही ठेकेदारांचे भले करण्यासाठी याच रस्त्यावर डांबरीकरण करून जनतेचा व आमदारांनी आणलेला निधी वाया घालवू नये असे मत पत्रकारांनी व्यक्त केले असता असता यावर वर्पे यांनी मुळ प्रश्‍नाला बगल देत त्यांनी हे रस्ते केवळ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागातील नसून सर्व नगरसेवकांच्या प्रभागातील असून जनतेसाठी आहेत असे थातुरमातुर उत्तर दिले मात्र त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही

राकॉ. गटनेते विरेन बोरावके म्हणाले, साठवण तलावाचे पाच कोटीची इस्टिमेट मंजूर झाले तर याच धाकापोटी वॉकाऊट नाट्य घडल्याचा आरोप त्यांनी केला वेळेत काम न झाल्याने बंदिस्त खुले नाट्यगृह साठी आलेला दोन कोटी निधीपरत जाऊ शकतो का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले, हो मदतीस न झाल्यास तो निधी  जाऊ शकतो याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी जलसंपदा विभाग जागेच्या भाडेपोटी वार्षिक पंचवीस ते तीस लाख रुपयांची मागणी करीत आहे. ते पालिकेला देणे शक्य नाही असे टिपणी मुख्याधिकारी यांनी दिली आहे. एक तर ही जागा केबीपी विद्यालय व एस एस जी एम कॉलेज यांच्यामधली आहे असेही त्यांनी सांगितले.  ४९ कोटी च्या पाणी योजनेचे थर्ड पार्टी वॉटर ऑडिट याला आमची काही हरकत नाही परंतु मुंडे ला बोलवा आणि ऑडिट करा एवढेच आमचे म्हणणे आहे असे बोरावके म्हणाले
क्रिडांगणाची जागा खरेदी करण्यासाठी त्या नगरसेवकांनी प्रत्येकी अकरा हजार रुपये देण्याची घोषणा केली आमचे नगरसेवक गरीब आहे आम्हीही फुल ना फुलाची पाकळी देवू, मात्र हा प्रश्न पस्तीस लाखाचा नसून कोट्यावधीचा आहे असेही त्यांनी सांगितले एकंदरीत झालेल्या प्रकार परिषदेत आरोप-प्रत्यारोप शिवाय राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून नगराध्यक्षांची पाठराखण केल्याचे दिसून येत होते.
बुधवारी दुपारी चार वाजता गौतम बँकेच्या h झालेल्या पत्रकार परिषदेसाठी गटनेते विरेन बोरावके, नगरसेवक संदीप वर्पे, मंदार पहाडे, मेहमूद सय्यद, सपना मोरे यांनीही चर्चेत भाग घेतला यावेळी नगरसेवक माधुरी वाकचौरे, वर्षा शिंगाडे, प्रतिभा शिलेदार, अजिज शेख, सुनील शिलेदार, रमेश गवळी, नवाज कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, खरे, संतोष चवंडके, आदी हजर होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page