जिल्हा काँग्रेस च्या सरचिटणीसपदी सौ.मीनल खांबेकर

जिल्हा काँग्रेस च्या सरचिटणीसपदी सौ.मीनल खांबेकर

वृत्तवेध ऑनलाईन ! Thu17Sep2020

By: Rajendra Salkar,20.00

 कोपरगाव    :  अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी कोपरगाव येथील माजी नगराध्यक्षा सौ.मीनल अशोक खांबेकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष तथा महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने जिल्हा अध्यक्ष श्री.बाळासाहेब साळुंके यांनी केली आहे.अहमदनगर जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून त्यात 10 सरचिटणीस असून त्या एकमेव महिला सरचिटणीस आहेत,सौ खांबेकर या काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्या असून सन 2014 ते 2016 त्या अहमदनगर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम केले आहे,जिल्हा नियोजन समिती सदस्या तसेच कोपरगाव नगरपरिषदेत नगरसेवक,5 वर्ष सतत उपनगराध्यक्ष,नगराध्यक्ष तसेच कोपरगाव शहर विकास आघाडीच्या गटनेत्या म्हणून त्यांनी काम केले आहे.संघटनात्मक व प्रशासकीय कामाचा त्यांना अनुभव असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी सांगितले.त्यांच्या निवडी बाबत कोपरगाव शहर तालुका काँग्रेस,युवक काँग्रेस,महिला काँग्रेस,विद्यार्थी काँग्रेस,सेवा दल कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page