नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी कोपरगावात वृक्षारोपण आणि लाडूचे वाटप
Modi’s birthday
वृत्तवेध ऑनलाईन।Fri18Sep2020
By: Rajendra Salkar,15.00
कोपरगाव : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवशी कोपरगाव तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण, चष्मे आणि लाडू चे वाटप करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव विधानसभा मतदार संघात सेवा सप्ताह १४ सप्टेंबर पासून विविध उपक्रमांनी राबविण्यात येत आहे.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड रविंद्र बोरावके, भाजपार्टी जिल्हा प्रतिनिधी शरद थोरात,पराग संधान, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष कैलास खैरे, भाजयुमोचे वैभव आढाव , गटनेते रविंद्र पाठक, विजयराव आढाव, राजेंद्र सोनवणे, बाळासाहेब नरोडे, शिवाजी खांडेकर, सत्येन मुंदडा, संजय पवार, रवि रोहमारे, दिपक जपे, महावीर दगडे, अविनाश पाठक प्रसाद परहे, गोपी गायकवाड, गोपी सोनवणे, अर्जुन मोरे, आदी उपस्थित होते.
ॲड. रविंद्र शरद थोरात, साहेबराव रोहोम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कैलास खैरे यांनी केले तर आभार सत्येन मुंदडा यांनी मांनले.