सुबोध मोरे यांच्याकडे कार्यकारी अभियंता अतिरीक्त कार्यभार

सुबोध मोरे यांच्याकडे कार्यकारी अभियंता अतिरीक्त कार्यभार

ते तर संजीवनी अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी

Alumni Hospitality

वृत्तवेध ऑनलाईन।Fri18Sep2020
By: Rajendra Salkar,15.20

कोपरगांव: महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता सुबोध मनोहर मोरे यांचेकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नाशिक कार्यालयाचा कार्यकारी अभियंता पदाचाही अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.ते संजीवनी अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी असून नवनवीन क्षितिजे पार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले पाहीजे, या विचार धारेतुन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितिन कोल्हे यांनी श्री व सौ मोरे यांचा छोटेखानी सत्कार संजीवनीच्या मुख्य कार्यालयाच्या निसर्गरम्य प्रांगणात करण्यात आला.

श्री मोरे यांचे सत्कार प्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, श्री मोरे यांचे वडील अॅड. मनोहर लक्ष्मण मोरे, आई सौ. मंगल मनोहर मोरे, पत्नी सौ. विजया सुबोध मोेरे, प्राचार्य डाॅ. डी. एन. क्यातनवार, विभाग प्रमुख डाॅ. एम.एस. पुरकर उपस्थित होते.
श्री सुबोध मोरे हे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील २००५ च्या बॅचचे सिव्हिल इंजिनिअर आहे. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (एमपीएससी) २०१५ मध्ये उत्तिर्ण केली आणि त्यांची महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या सहायक कार्यकारी अभियंता पदावर नेमणुक झाली. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातुन सिव्हिल इंजिनिअरींग करून आज सुमारे १२७ माजी विध्यार्थी शासनाच्या विविध उच्च पदावर कार्यरत आहेत. अनेक माजी विध्यार्थी वेळ मिळेल तेव्हा संस्थेत येतात आणि व्यवस्थापन व आपल्या शिक्षकांप्रती आदर व्यक्त करून नवीन विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करतात. यामुळे नवीन विद्यार्थ्यांनाही आपल्या पुढील वाटचालीसाठी दिशा मिळते. अशा सर्वच शाखांमधिल माजी विध्यार्थी देश परदेशात कार्यरत असुन आपापल्या क्षेत्रात त्यांनी आपले वेगळे आस्तित्व निर्माण करून किर्तीमान स्थापित केले आहे. बाहेरून येणारे माजी विध्यार्थी व त्यांच्या कुटूबियांसाठी संस्थेने सुसज्य असे निवासस्थान बांधलेले असुन अनेक जण येथे येत असतात आणि आपल्या स्मृतिंना उजाळा देतात. श्री सुबोध मोरे हे कोपरगांवचेच असुन ते जेव्हा येतात तेव्हा विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करतात.

कोटः
‘प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आई वडील हे पहिले गुरू असतात, त्यांच्याकडून मला कायम प्रेरणा मिळत राहीली. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना आमच्या अगोदरच्या बॅचचे परंतु एमपीएससी उत्तिर्ण झालेले विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि प्राद्यापकांचे मार्गदर्शन यामुळे मला स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याची दिशा मिळाली आणि यशस्वीही झालो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुश्यात शिक्षण घेतलेल्या षिक्षण संस्थेमधुन कसा प्रकारचे संस्कार घडतात आणि संस्कृती रूजविली जाते हे खुप महत्वाचे आहे. आज संजीवनी मधुन बाहेर पडून १५ वर्षे लोटली, परंतु संजीवनीमध्ये आल्यावर पुर्वी इतका किंबहुना अधिकचा जिव्हाळा जाणवतो, ही बाब संजीवनीने व आम्हीही जपलेल्या नात्याची पावती आहे,’ श्री सुबोध मोरे.

Leave a Reply

You cannot copy content of this page