१ जुलै कृषी दिनानिमित्त महाराष्ट्रातील साऱ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा!

१ जुलै कृषी दिनानिमित्त
महाराष्ट्रातील साऱ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा!

कोपरगाव :

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन (1 जुलै) ‘महाराष्ट्र कृषी दिन’ (Maharashtra Krishi Din) म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे, त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो. आजही महाराष्ट्रात शेतकर्‍यांची स्थिती बिकट आहे. देशाचा अन्नदाता असणार्‍या शेतकर्‍यांवर बिकट संकट असल्याने अनेकजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. अशा प्रसंगात त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देऊन सावरण्याची गरज आहे.

मात्र कोरोना तळाशी जगाचा पोशिंदा ठरलेल्या शेतकऱ्यांप्रती आजच्या ‘कृषी दिना’पासून प्रत्येकाने आपलं असलेले सामाजिक भान लक्षात घेता बिकट काळात शेतकर्‍याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ देणं गरजेचे आहे. म्हणूनच राज्यातील सा-या शेतकर्‍याला ‘महाराष्ट्र कृषी दिना’च्या शुभेच्छा !

Leave a Reply

You cannot copy content of this page