गुरव युवक – युवतींसाठी २४ ला ऑनलाईन व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर -सचिन धारुरकर
थेट उस्मानाबाद येथून ऑनलाईन
वृत्तवेध ऑनलाईन।Sun20Sep2020
By: Rajendra Salkar, 20.00
कोपरगाव :अखिल गुरव समाज संघटनेचे प्रदेश युवा कार्यकारी अध्यक्ष सचिन प्रविण धारुरकर यांच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्व गुरव समाज बंधू भगिनी साठी व्यावसायिक ऑनलाईन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तीन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सर्व व्यवहारावर परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे मंदिर बंद असल्याने पुजारी गुरव यांच्यावर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.
त्यामुळेच समाज जागृती करण्यासाठी ऑनलाईन व्यवसाय व रोजगार संधी मार्गदर्शन शिबिर गुरूवारी (२४ सप्टेंबर) रोजी अखिल गुरव समाज संघटना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष गुरव समाज भूषण आण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्व समाजातील तरुणांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांचे रोजगार व व्यवसाय संधी, स्पर्धा परीक्षा करीअर यावर ऑनलाइन वेबिनार आयोजित करण्यात आले आहे .
या वेबिनारमध्ये गुरूवारी (२४ सप्टेंबर) रोजी सकाळी ११ वाजता करीअर मार्गदर्शन- डॉ.गणेश कारभारी (पुणे विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक. इलेक्ट्रॉनिक आणि संप्रेषणात पीएचडी. प्रेरक वक्ता ) स्पर्धा परीक्षा करीअर मार्गदर्शन दुपारी १ वाजता प्रा. अभिजित पवार ( कॉम्प्युटेटी परीक्षा, शिक्षक युनिक ॲकडमी &पृथ्वी ॲकडमी पुणे.) व्यवसाय व रोजगार संधी . सायंकाळी ७ वाजता बालाजी बिराजदार, उद्योग निरीक्षक,जिल्हा उद्योग केंद्र लातुर हे करणार आहेत. मार्गदर्शन शिबिर वेबिनारचे समाजातील सर्व युवक युवतींनी, विद्यार्थी/ इच्छुकांनी सहभाग नोंदवून या ऑनलाइन मार्गदर्शनपर सत्राचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रदेश युवा कार्यकारी अध्यक्ष सचिन धारुरकर यांनी केले आहे.
ऑनलाइन वेबिनार साठी आपल्याला पुढील सूचनांचे पालन करावे लागेल
(1).आपल्याकडे Google meet app यापूर्वी install केलेले नसेल तर install करून घ्यावे.(2).आपण Google meet app मधून कनेक्ट झाल्यानंतर Ask to join वर क्लिक करावे.(3).सदर सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी १५ मिनिटे वेळेपूर्वी जॉईन करावे.(4).दिलेल्या लिंक मधून connect झाल्यावर लगेच आपला video व mike mute/ बंद करावे. (5).वेबिनारच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक unmute/सुरु करून विचारावे व लगेच माईक. mute/बंद करण्याची दक्षता घ्यावी. अधिक माहिती साठी संपर्क मोबो.नं 8275515971
https://wa.me/918275515971
यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.