व्यापाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा – आ. आशुतोष काळे

व्यापाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा – आ. आशुतोष काळे

Merchant questions

वृत्तवेध ऑनलाईन।Mon21Sep20
By: Rajendra Salkar, 16.45

कोपरगाव : शहरातील व्यापाऱ्यांच्या अडचणीवर मार्ग काढून त्यांचे प्रश्न तातडीने सोडवा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव पालिका प्रशासनाला सोमवारी (२१) रोजी साई तपोभुमी येथे झालेल्या बैठकीत दिल्या.

कै. बाबू भिलाजी वाणी व्यापारी संकुलातील ज्या व्यापाऱ्यांनी लिलाव खरेदी केली आहे पण करार केले नाही त्यांचे करार करून घ्यावे. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाची तातडीने दुरुस्ती करा, साठवण तलाव क्रमांक ५ व वाढीव पाईपलाईनचे इस्टीमेट तयार करा, नदी संवर्धन, खंदकनाला सुशोभीकरण व दोन्ही स्मशानभूमी नूतनीकरणासाठी प्रस्ताव तयार करावा. शुक्लेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग निधी मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करा या सूचना आशुतोष काळे यांनी दिल्या.
यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गटनेते वीरेन बोरावके, नगरसेवक मंदार पहाडे, सुनील शिलेदार, दिनार कुदळे,अभियंता दिगंबर वाघ, लिपिक राजू गाडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page