कोरोनात घरातील स्त्री अन्न, आरोग्य व शिक्षण मंत्र्यांची भूमिका बजावत आहे- सौ मनाली कोल्हे
Run with Sanjeevani,
संजीवनी स्कूल्सचे ‘रन विथ संजीवनी, रन फाॅर हेल्थ’ ११०० किमी पल्ला कापला
वृत्तवेध ऑनलाईन।Tue 22Sep20
By: Rajendra Salkar, 12.10
कोपरगांव: सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात घरातील महिला मुलांच्या संगोपनाबरोबरच अन्नपुर्णा म्हणून आरोग्यबाबत महत्वाच्या भुमिका बजावत आहे. तर मुलांच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये घरात त्या एका शिक्षिकेची व मार्गदर्शिकेची जबाबदारी पार पाडीत आहे.एकंदरीत कोरोनात घरातील स्त्री अन्न, आरोग्य व शिक्षण मंत्र्यांची भूमिका बजावत आहे असे गौरवोद्गार संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवासा निमित्ताने संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्स तर्फे विद्यार्थ्यांसह महिला पालकांसाठी ‘रन विथ संजीवनी, रन फाॅर हेल्थ’ या उपक्रमाचे आयोजन दि. १८ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान करण्यात आले होते.
या उपक्रमात संजीवनी अकॅडमी, कोपरगांव, संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी व संजीवनी टाॅडलर्स, येवला येथिल विद्यार्थी व त्यांच्या महिला पालकांनी उत्स्फुर्द प्रतिसाद दिला. आणि सर्वांनी मिळनु ११०० किमी. अंतर कापले.
सौ. मनाली कोल्हे म्हणाल्या, घरातील सर्व सदस्य आरोग्य संपन्न रहावेत यासाठी समस्त महिला वर्ग काळजी घेत आहे. या सर्व गृहीणींच्या आरोग्याची काळजी घेण्याचा व त्यांना आरोग्य विषयक जागरूक करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न होता.
हा उपक्रम महिला पालकांसहित पुर्व प्राथमिक, प्राथमिक तसेच इयत्ता ५ वी ते १० वीच्या विध्यार्थ्यांसाठी होता. मातांनी २ किमी चालायचे किंवा धावायचे होते. पुर्व प्राथमिक विदयार्थ्यांसाठी ५०० मीटरचे अंतर होते.इ.१ ली ते ४ थीच्या विध्यार्थ्यांसाठी १ किमी व ५ वी ते १० वीच्या विध्याथ्र्यांसाठी २ किमीचे अंतर होते. सर्व सहभागी महिला पालक व विध्यार्थी यांनी चालताना किंवा धावतानाचे व्हिडीओ आपापल्या शाळेकडे पाठवायचे होते. सर्व सहभागी मातांना ई-प्रमाणपत्र देण्यात आले. संजीवनीच्या सर्व सहभागी महिला पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असुन संजीवनीने हा अनोखा उपक्रम राबवुन आरोग्यविषयी जनजागृती केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या उपक्रमात सर्व सहभागी महिला पालकांचे व विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सुमारे ६५० महिला पालक व विध्यार्थी यांनी सहभाग नोंदविला व आनंदही घेतला.