कोल्हे कारखाना : अपघातग्रस्त शिवाजी दवंगेंना ; उपचारास ५० हजाराचा विमा धनादेश.

कोल्हे कारखाना : अपघातग्रस्त शिवाजी दवंगेंना ; उपचारास ५० हजाराचा विमा धनादेश.

Accident insuranceAt the hands of Vivek Kolhe

वृत्तवेध ऑनलाईन।Tue 22Sep20
By: Rajendra Salkar, 15.40

 

कोपरगाव : संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याने सर्व सभासद व कामगारांची समूह व्यक्तिगत अपघात विमा पॉलिसी घेतली असून, त्याअंतर्गत मळेगाव थडी येथील सभासद शिवाजी रामभाऊ दवंगे मोटरसायकल अपघातात जखमी झाले होते त्यांना वैद्यकीय उपचारासाठी ५० हजार रुपयांचा विमा धनादेश संचालक व कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

विवेक कोल्हे म्हणाले, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या दूरदर्शीपणाने कोल्हे कारखान्याचे सर्व अ वर्ग सभासदाबरोबरच कर्मचाऱ्यांचा देखील व्यक्तिगत अपघात विमा उतरवण्यात आला असून, सभासद व कर्मचारी अपघातात जखमी झाल्यास त्यांना वैद्यकीय उपचारासाठी ५० हजार रुपये तर अपघाती निधन झाल्यास दोन लाख रुपयांची मदत त्यांच्या वारसांना देण्यात येत आहे. अडचणीच्या काळात विमा रकमेचा मोठा आधार आहे. सध्या साथजन्य अाजाराची स्थिती गंभीर झाली आहे.

यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक राजेंद्र सूर्यवंशी, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, कामगार कल्याण अधिकारी, एस सी. चिने, संतोष दवंगे उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page