कर्मवीर भाऊराव पाटील जयंती; केबीपी विद्यालयात उत्साहात
वृत्तवेध ऑनलाईन।Tue 22Sep20
By: Rajendra Salkar, 16.50
कोपरगाव ; शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त येथे असलेल्या अतिभव्य पूर्णाकृती पुतळ्यास आमदार आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आशुतोष काळे म्हणाले, संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्यावर संस्थेची नगर उत्तरची जबाबदारी सोपवली त्यांना अपेक्षित असलेली आदर्शवत कामगिरी पार पाडणार असून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आदर्श विचारांनी प्रेरित होऊन रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारासाठी माजी खा. कर्मवीर शंकरराव काळे यांनी मोलाचे योगदान दिले. ती परंपरा माजी आ. अशोक काळे सुरु ठेवली असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
यावेळी कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, प्राचार्य शंकरराव थोपटे, प्राचार्य विश्वास काकळीज, प्राचार्या मंजुषा सुरवसे, दरेकर, आप्पासाहेब आव्हाड, सुनीता वाबळे, संतोष पेटकर, बाळासाहेब निर्मळ, काशीनाथ लव्हाटे, नरेंद्र ठाकरे, शहाजी सातव आदी उपस्थित होते.





