शाश्वत पाणी देऊन पूर्व भागाची दुष्काळी ही ओळख पुसणार – आ. आशुतोष काळे

शाश्वत पाणी देऊन पूर्व भागाची दुष्काळी ही ओळख पुसणार – आ. आशुतोष काळे

कोपरगाव :
वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या पूर्व भागातील शेतकऱ्याच्या दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास मदत व्हावी, पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी तसेच या भागातील शेतीसाठी शाश्वत पाणी उपलब्ध करून देवून पूर्व भागाची दुष्काळी ही ओळख पुसणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
यावेळी या ठिकाणी त्यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .

कोळ नदीवरील भोजडे येथील साखळी बंधाऱ्याचे जलपूजन प्रसंगी आमदार काळे बोलत होते. या बंधाऱ्याचा लाभ भोजडे, गोधेगाव, लौकी, घोयेगाव, धोत्रे, वारी व परिसरातील शेतीला होणार आहे.

आ. काळे पुढे म्हणाले की, रस्ते, वीज, पाणी या त्रिसूत्रीवर भर देणार आहे. नियोजनबध्द विकासकामे करुन दुष्काळी गावांची दुष्काळी ओळख पुसण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोपरगाव मतदार संघाला गतवैभव प्राप्त करून देतांना घोयेगाव लौकी ते वारी भोजडे हद्दीपर्यंत बंधारे बांधुन शेती सिंचनाचा प्रश्न सोडवू अशी ग्वाही आमदार आ. काळे यांनी यावेळी दिली.

अनेक वर्षापासून कोरड्या पडलेल्या या बंधाऱ्यात आ. काळे यांनी समृद्धी कामाच्या गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीला आदेश देवून खोलीकरण केले व पाटबंधारेकडून आवर्तनातून हा बंधारा भरला आहे. त्यामुळे चारशे ते पाचशे हेक्टर क्षेत्राला या बंधाऱ्याचा लाभ होणार असल्याने आहे. शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

याप्रसंगी भाऊसाहेब सिनगर, गोरक्षनाथ जामदार, सुधाकर रोहोम, चारुदत्त सिनगर, मधुकर टेके, बाळासाहेब सिनगर,सरपंच दत्तात्रय सिनगर,शरद जोशी, फारुख पटेल, गणेश घाटे, माधव खटकाळे, ज्ञानेश्वर सिनगर,आप्पासाहेब धट, बाळासाहेब मंचरे, सुधाकर वादे, धोंडीराम धट, आनंदराव सिनगर,दिगंबर बोर्डे, दौलत गलांडे, भाऊराव सांगळे, शिवाजी नाईकवाडे, दिलीप सिनगर, राजू घनघाव, किरण आहेर, ग्रामसेवक संग्राम बोर्डे आदी उपस्थित होते.

फोटो ओळी- भोजडे येथील कोळ नदीवरील साखळी बंधाऱ्याचे जलपूजन करतांना आमदार आशुतोष काळे

Leave a Reply

You cannot copy content of this page