कोपरगावात एकाच दिवसात ३ कोरोना पॉझिटिव्ह आढळले; डॉक्टरचा समावेश
ओम नगर निवारा परिसर सील, पोलिसांचे बॅरिकेट
रविवार पर्यंत संपूर्ण कोपरगाव लॉक डाऊन करण्याचे प्रशासनाकडून संकेत
कोपरगाव :
कोरोनाचा फैलाव रोखण्यात यशस्वी ठरलेल्या कोपरगावात बुधवारी एकाच दिवसात ३ कोरोना पॉझिटिव्ह आढळले एका डॉक्टरचा समावेश, कन्टोनमेंट झोन म्हणून ओम नगर, निवारा परिसरात पोलिसांचे बॅरिकेट लागल्याने लागलय नागरिकांत घबराटीचे वातावरण नागरिकांच्या वाढत्या मुक्त संचारामुळे कोपरगाव रविवारपर्यंत लॉक डाउन करण्याचे स्थानिक प्रशासनाकडूनच संकेत देण्यात आले आहेत .
एका डॉक्टरसह दोन जण असे ३ जण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. तर आणखी एक जणांचा अहवाल येणे बाकी आहे. सोमवारी ४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय नगर येथे पाठविण्यात आले होते अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
सोमवारी (२९जून) रोजी ४ जणांचे स्वॅब नगर जिल्हा रुग्णालय येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते
यापैकी तीन जणांचे अहवाल बुधवारी (१जुलै) रोजी प्राप्त झाले असून तीनही जणांना कोरोना ची लागण झाली आहे यात ओमनगर खडकी रोड येथे ४५ वर्षीय डॉक्टर व ६५ वर्षीय वडिलांचा तर एक जण टाकळी येथे मुंबईहुन सासरवाडीला आलेला पाहुणा असल्याचे समजते .
कोपरगावात अद्यापपर्यंत ५ कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते हे सगळे
जण बरे होऊन घरी गेले आहेत, या सर्वांना बाहेरून आलेल्या पाहूण्यामुळे कोरोनाची लागण झालेली होती. परंतु सुदैवाने त्यांच्या संपर्कात आलेल्या कोपरगावातील कुणालाही कोरोनाची लागण झालेली नव्हती. आत्तापर्यंत ३५ ४० इतक्या रुग्णांची जिल्हा रुग्णालयात स्वॅब तपासणी करण्यात आलेली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे यांनी दिली.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने ओम नगर व निवारा या चारशे ते पाचशे घरे असलेला परिसर कन्टोनमेंट झोन म्हणून सील करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली. संचार बंदी मध्ये शिथीलता दिल्याने नागरिकांचा मुक्त संचार वाढला आहे यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन संपूर्ण कोपरगाव रविवार पर्यंत लॉक डाउन करण्याचा विचार सुरू असल्याची माहितीही तहसीलदार चंद्रे यांनी दिली
यावेळी मुख्य नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी ही परिसराची पाहणी केली आहे.
दरम्यान पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनीही परिसराला भेट देऊन लोकांना शासकीय आदेश पाळण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान सदर व्यक्ती येवला नाशिक या ठिकाणी जाऊन आल्याचे माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे निवारा परिसरात पोलिसांनी बॅरिकेट टाकल्यामुळे नागरिकांची चांगलीच दहशत पसरली आहे





