ग्रामीण रुग्णालयास आमदार निधीतून १६ ऑक्सिजन बेड,२ व्हेंटीलेटर, २ बायपॅप मशीन

ग्रामीण रुग्णालयास आमदार निधीतून
१६ ऑक्सिजन बेड,२ व्हेंटीलेटर, २ बायपॅप मशीन

Kopargaon Rural Hospital

वृत्तवेध ऑनलाईन। Fir25Sep2020
By:Rajendra Salkar, 18.30

कोपरगाव : कोरोना बाधितांना कोपरगाव मध्येच उपचार मिळावे यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या आमदार निधीतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयासाठी १६ ऑक्सिजन बेड, २ व्हेंटीलेटर व २ बायपॅप मशीन दिले अशी माहिती रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉ. अजय गर्जे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यापासून आ. आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला सर्वोतोपरी मदत केली असून इंफ्राग्रेड थर्मामीटर, ऑक्सिमीटर, पिपीई कीट, एन. ९५ मास्क, फेस शिल्ड मास्क अशा प्रकारचे सर्व साहित्य त्यांनी पुरविले आहे. सर्व बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी ते आरोग्य विभागाशी सतत संपर्क ठेवून आहे. कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोपरगाव येथील कोविड केअर सेंटर मध्ये बहुसंख्य बाधित रुग्ण उपचार घेवून पूर्णपणे बरे देखील झाले आहेत मात्र गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयाशिवाय पर्याय नव्हता.गंभीर रुग्णांना शिर्डी येथे उभारलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये उपचार मिळावे यासाठी आ. आशुतोष काळे यांनी प्रयत्न देखील केले. मात्र शिर्डीकरांनी विरोध दर्शविला आहे.

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये १६ ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून सोबत २ व्हेंटीलेटर व २ बायपॅप मशीन दिले देखील देण्यात आले आहे. एकून २० बेडचे हे अद्यावत अतिदक्षता विभाग लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या मध्ये १६ बेड आयसीयु प्रमाणे असणार असून सर्व बेडला सेंटर ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे. ४ बेड साठी व्हेंटीलेटर बसविण्यात येणार असून ५ मॉनिटर, १ डी फेब्रीलेटर मशीन व इसीजी मशीन या विभागात असणार आहे अशी माहिती डॉ. गर्जे यांनी दिली असून पुढील आठवड्यात या सुविधा गंभीर व अंत्यवस्थ रुग्णांना मिळणार असल्याचे सांगितले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू दर कमी होणार असल्याचे गटनेते विरेन बोरावके यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page