माहेगांव देशमुख तीन दिवस लॉकडाऊन- सरपंच पानगव्हाणे

माहेगांव देशमुख तीन दिवस लॉकडाऊन- सरपंच पानगव्हाणे

वृत्तवेध ऑनलाइन। Thu 29Sep20
By: Rajendara Salkar, 15.00

कोपरगाव : तालुक्यातील माहेगांव देशमुख मध्ये कोरोना बाधित दहा रुग्ण सापडले आहेत. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गाव तीन दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे . नागरिकांनी घाबरून न जाता जागरूक राहून काळजी घ्यावी असे आवाहन लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांनी केले आहे.

माहेगांव देशमुख मध्ये कोरोना बाधितांची संख्या दहावर पोहचल्याने कोपरगाव चे तहसीलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्याशी चर्चा केल्यानंतर सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे ,पोलीस पाटील विक्रांत काळे, ग्रामसेवक जी. पी. शेळके , कामगार तलाठी संदीप ठाकरे, प्रशासन व ग्रामपंचायतीने तीन दिवस गाव बंद ठेवले आहे. बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश नाही तसेच गावातील व्यक्ती बाहेर जाऊ शकणार नाही अशी दक्षता यावेळी घेण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यवहार ३० सप्टेंबर पर्यंत बंद राहणार आहे. जर कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आली नाही. तर आणखी काही दिवस बंद पुढे ढकलण्यात येईल अशी माहितीही सरपंच पानगव्हाणे यांनी दिली.

अंगणवाडी सेविका ,आरोग्य सेविका, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व प्रशासनातील सर्व अधिकारी यावर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये . दररोज सँनिटायझरचा वापर करावा. तोंडाला मास्क लावावे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. काही लक्षणे आढळल्यास ग्रामपंचायत कार्यालयासी संपर्क साधावा असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page