कोपरगावात पुरूषाची गळफास घेऊन आत्महत्या

कोपरगावात पुरूषाची गळफास घेऊन आत्महत्या
कोपरगाव :

कोपरगावात शहरातील खडकी भागात राहणाऱ्या सत्तावन्न वर्षाच्या पुरुषाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.नैराश्यातच त्याने जीवनाला कंटाळून हे कृत्य केले असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली. या घटनेप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोरोनाचा जगभर कहर सुरु असल्याने लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने तणावात आलेल्या पाडुरंग जगन्नाथ वैराळ वय 57 वर्षे रा.खडकी कोपरगाव याने राहते घरातील फँनला नायलाँन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना बुधवारी (१ जुलै) रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी नारायण पाडुरंग वैराळ यांनी
दिलेल्या खबरीवरून पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page