संजीवनी अकॅडमीमध्ये विद्यार्थी समितीची निवड ; ही बालवयातच लोकशाही मुल्यांची रूजवण -अनुराधा आदिक
वृत्तवेध ऑनलाईन ।Sat 3Oct2020
By: Rajendara Salkar, 13.00
कोपरगाव : देशाच्या प्रगतीमध्ये लोकशाही मुल्यांना अनन्य साधारण महत्व आहे. संजीवनी अकॅडमीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी ऑनलाईन प्रणालीने लोकशाही पध्दतीने विद्यार्थी समितीची निवड ही बालवयातच लोकशाही मुल्यांची रूजवण असल्याचे गौरवोद्गार प्रमुख पाहुण्या श्रीरामपुर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी व्यक्त केले.
संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांचे संकल्पनेनुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी शालेय कामकाज चालविण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थी परिषद मंडळ निवडण्यात आले. या निवडीनंतर सौ. कोल्हे, सर्व निवड झालेले विद्यार्थी, त्यांचे पालक, प्राचार्या सौ. सुंदरी सुब्रमण्यम आणि शिक्षक शिक्षक यांच्यासह ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थी मंडळाला पद व गोपनियतेची शपथ देण्यात आली. यावेळी पालकांनीच निवड झालेल्या त्यांच्या पाल्यांना कॅप व स्कार्फ परीधान करून अधिकृतरित्या पदे बहाल केली.
या निवडणुकीत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणुन खुश हिम्मत पटेल याची निवड झाली तर विद्यार्थिनी प्रतिनिधी पदावर कु. प्रगती प्रशांत होन हीची निवड झाली. विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट तयार करून त्या गटांमार्फत विविध ऊपक्रम राबविवण्यात येतात. या गटांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्यांची नावे देण्यात आली आहेत. या गटांसाठीही कॅप्टन व व्हाईस कॅप्टनच्या निवडी करण्यात आल्या आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे. अनुक्रमे कॅप्टन व व्हाईस कॅप्टन. प्रतापगड-.निरज निलेश राजुरकर, कु.झिबिया अब्राहम आशिष , सिंहगड- आदित्य किरण होन, तन्मय विलास काकडे, रायगड-साईश सुदाम लावरेे, मोहित कैलास शर्मा , तोरणागड- कुश मनोज बत्रा, मंथन प्रशांत काबरा.
तसेच स्कूल मध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांमध्ये विद्यार्थी पुढे येवुन नेतृत्व गुण सिध्द करतात आणि आपल्यातील सृजनशिलतेमधुन विद्यार्थी समुहाला पुढे नेत उपक्रम यशस्वी करतात. अशा क्रिएटिव्ह टीम हेड म्हणुन मनस्वी विजय नरोडे, सिया तरूण भुसारी, मुद्रा अमोल व्यास व तिथी विनोद मालकर यांची निवड करण्यात आली.
व्हर्चुअल पध्दतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातुन चालु शैक्षणिक वर्षातील कोविड १९ चे मार्गदर्शक तत्वे सांभाळत पुढील नियोजनाबाबत संकल्पना मांडल्या. यावर आदिक यांनी प्रतिक्रिया देताना सांगीतले की या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभासंपन्नते बरोबरच उत्कृष्ट वर्कृत्व गुण आहे. ज्यांच्याकडे वर्कृत्व असते त्यांच्याकडे नेतृत्व येवुन त्यांच्या हातुन भविष्यात दातृत्वही अंगिकारले जाते. विद्यार्थ्यांचे अशा प्रकारचे यश म्हणजे माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे यांनी सर्वगुण संपन्न पिढीचे पाहीलेल्या स्वप्नांना, संस्थेचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व संचालिका सौ. कोल्हे यांचे मार्फत मिळत असलेल्या बळकटीचे प्रतिबिंब आहे.
सर्व विद्यार्थी परिषद मंडळातील सदस्यांचे स्कूलच्या वतीने अभिंनदन करण्यात आले. निवडणुक अधिकारी म्हणुन विरूपक्ष रेड्डी यांनी काम पाहीले.