कलम २९५ (अ) आयपीसीः धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा दाखल
वृत्तवेध ऑनलाइन। Sat3Oct2020
By:RajendraSalkar,18.30
कोपरगाव : तालुक्यातील धामोरी येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक मुतारीच्या भिंतीवर काळ्या रंगाच्या शाईने कोणा अज्ञात आरोपीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण लिहून सामाजिक व धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (३)रोजी सकाळी साडे आठ वाजे पूर्वी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण लिहून धार्मिक भावना दुखावल्या, आरोपी व्यक्तीने जाणूनबुजून नागरिकांच्या धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याचे उद्देशाने बुध्दीपुरस्पर व दुष्ट उद्देशाने कृत्य केलेले आहे. असा आरोप करत अविनाश बाळासाहेब आहिरे (३३) रा. धामोरी यांनी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ (अ) अन्वये तक्रार दाखल केली.
सदर फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवि कलम २९५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल कटके हे करीत आहे.