समता पतसंस्थेचे जेष्ठ संस्थापक संचालक मोहनशेठ झंवर यांचे निधन
वृत्तवेध ऑनलाईन।Sat 3Oct2020
By: Rajendara Salkar, 20.00
कोपरगाव: समता नागरी सहकारी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक मोहनशेठ झंवर यांचे अल्पशा आजाराने शनिवार दि.३ ऑक्टोबर रोजी दु:खद निधन झाले.
समताच्या स्थापनेत देखील कै. मोहनलाल झंवर यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. समताच्या स्थापनेपासून ते आजतागायत ते संचालक पदी कार्यरत होते. अतिशय प्रामाणिक व अभ्यासु व्यक्तिमत्वाचे निधनामुळे समता परिवाराची देखील हानी झाल्याचे संचालक संदीप कोयटे, अरविंद पटेल व जितुभाई शहा यांनी सांगितले.
कै. मोहनशेठ हे कोपरगाव किराणा मर्चंट असोसीएशनचे देखील अध्यक्ष होते. किराणा व्यापाऱ्यांकरीता मनी सर्कुलेशन स्कीम, भिशी योजना अशा अनेक योजना त्यांचे कारकिर्दीत राबवल्या गेल्या. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये किरणा असोसिएशनचा नेहमीच पुढाकार असे. सध्या चालू असलेल्या कोरोनाच्या वातावरणात कोपरगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांना दररोज ७०० ते ८०० डबे पोहचविण्याचा सामाजिक उपक्रम जवळपास २ महिने राबविला गेला. अशाच प्रकारचे विविध सामाजिक उपक्रमात कै.मोहनशेठ यांचा नेहमीच सहभाग असायचा. त्यांचे दु:खद निधनाने आज कोपरगाव शहरातील किराणा व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.