नाकर्तेपणा झाकण्यासाठीच ; राज्य सरकारचा केंद्र सरकारवर खापर फोडण्याचा प्रयत्न – आ. गिरीश महाजन

नाकर्तेपणा झाकण्यासाठीच ; राज्य सरकारचा केंद्र सरकारवर खापर फोडण्याचा प्रयत्न – आ. गिरीश महाजन
मोदींच्या ऐतिहासिक निर्णयामुळे जग आश्चर्यचकित
कोपरगाव :
देशात आलेल्या कोरोना महामारीच्या संकटाला केंद्र सरकार धैर्याने तोंड देत असतांना राज्यसरकार आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी केंद्र सरकारवर खापर फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा हल्लाबोल माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी माजी आ. सौ स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत झालेल्या व्हर्चुअल सभेत केला.
मोदी सरकारच्या पहिल्या वर्षाचा यशस्वी कारकिर्दीबद्दल देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने व्हर्चुअल सभेचे आयोजन केले जात आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी भाजप नेते , माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती.
आ. महाजन म्हणाले की, केंद्र सरकारच्या कलम 370, राममंदिर, तिहेरी तलाक, पंतप्रधान किसान सन्मान योजना, जनधन योजना, सर्जिकल स्ट्राईक, मोफत उज्वला गॅस योजना,आरोग्य सेतु, नागरीकत्व कायदा, वयाच्या साठीनंतर पेन्शन योजना, बचतगटाशी जोडलेल्या भगिनींना आणखी आर्थीक सहाय्य, सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे गरजूंना मोफत अन्नधान्य या मोदी सरकारच्या काळातील लोकप्रिय योजनांची माहिती देवुन पुढे म्हणाले की, आत्मनिर्भर भारत अभियानासाठी 20 लाख कोटी रूपयाचे पॅकेज देउन भारतीयांसाठी नव्या संधीचे दारे उघडली. कोरोना महामारीच्या संकटकाळात केंद्र सरकारने दिलेली मदतही राज्यसरकार जनतेपर्यंत वेळेत पोहचू शकले नाही, त्यांचा हा नाकर्तेपणा झाकण्यासाठी केंद्रावर आखपाखड केली जात आहे.
यावेळी संवाद साधतांना माजी आ. सौ कोल्हे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत घेतलेल्या ऐतिहासिक
निर्णयामुळे विकासाला गती मिळाली , गोरगरीब,कप्टकरी, शेतकरी, महिला, युवकांना सशक्त करण्या-या गोप्टींना प्राधान्य दिले गेले. लोकाभिमुख योजनाची निर्मिती जनतेला आधार देण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तळागाळातील सर्व घटकांचा विचार करून देशाला ख-या अर्थाने विकासाकडे नेण्याचे काम करत असल्याचे कोल्हे म्हणाले.
दुसऱ्या पर्वातील पहिल्या वर्षाची सुरुवात करतानाच भाजपने १०० दिवसांचा आश्वस्त असा ‘प्लॅन’ तयार ठेवला होता. त्यानुसार अनेक महत्वपूर्ण निर्णयांचे कायद्यामध्ये रुपांतर देण्यात केंद्र सरकार यशस्वी झाले. सरकारला सहा महिनेही पूर्ण होेण्यापूर्वीच मोदी सरकारने असे काही धडाकेबाज निर्णय घेतले की, केवळ विरोधक, भारत देशच नाही, तर सारे जग आश्चर्यचकीत झाले. विरोधक तर अजूनही सैरभैरच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या दिवसापासून कोरोना संकटाशी लढण्याची धुरा स्वत:च्या हातात घेतली. अत्यंत नियोजनपूर्वक मोदी यांनी कोरोनाविरुद्ध लढा सुरू केला आहे. कोरोनाच्या विरोधात मोठे यश मिळाले नसले, तरी या रोगाला नियंत्रित करण्यात भारताला यश मिळाले आहे. हे फार मोठे यश मानायला हवे. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे संपूर्ण भारत बंद आहे, आता टप्प्याटप्प्याने तो ‘अनलॉक’ होत आहेत. गत तीन महिने भविष्याच्या चिंतेने संपूर्ण देश कासावीस असताना केंद्राने उद्योगांसह कामगारांच्या हिताला प्राधान्य देत २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज, ‘आत्मनिर्भर भारत’ योजना लागु केली. केंद्राने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत तीन महिन्यात ज्या ज्या योजनांची घोषणा केली त्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील भाजपाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते नेटाने काम करीत आहेत. पाच वर्षात जनधन योजना, पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना, मन की बात, पंतप्रधान आरोग्य विमा, आयष्मान भारत, उज्ज्वला योजना अशा अनेकविध उपयोगी योजनांच्या माध्यमातून मोदींनी आपली नाळ सर्व सामान्यांसोबत जोडली. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता कोरोनाचे युद्ध यशस्वीपणे जिंकणारा आणि त्यावर मात करुन देश समृध्द करणारा भारत हा पहिला देश ठरेल, यासाठी आवश्यक ती आखणी मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून होते आहे, ही निश्चितच समाधानाची बाब आहे.
यावेळी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, व्हा.चेअरमन आप्पासाहेब दवंगे, जिल्हा संयोजक शरदनाना थोरात, केशवराव भवर, दिलीप दारूणकर, भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष कैलास खैरे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे, शहराध्यक्ष वैभव आढाव, माजी सभापती सुनिल देवकर, दत्ता काले, हरिभाउ गिरमे, महावीर दगडे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष योगिता होन, शहराध्यक्षा
शिल्पा रोहमारे, भाजपा सोशल मिडीया सेलचे जिल्हा संयोजक भाउसाहेब वाकचौरे, व्हर्चुअल
सभेचे जिल्हा संयोजक योगराजसिंग परदेशी उपस्थित होते. प्रास्ताविक दिलीप दारूणकर यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page