व्हर्चुअल सायक्लोथाॅन; सर्वांनी मिळुन  १०,५६५  किमी अंतर कापले.  

व्हर्चुअल सायक्लोथाॅन; सर्वांनी मिळुन  १०,५६५  किमी अंतर कापले.  

  Virtual cyclothon;

संजीवनी फाऊंडेशन व रोटरी क्लब

वृत्तवेध ऑनलाइन।MonOct5,2020
by:RajendraSalkar,18.30                             

कोपरगांव: संपुर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले असुन भारतातही अनेक कुटूंबांनी आपले  आप्तेष्ठ  गमावले आहेत. यावर प्रत्येकाने संसर्गाची बाधा होवु नये, याची काळजी घेण्याबरोबरच स्वतःची तंदुरूस्ती आणि प्रतिकार शक्ती या बाबी प्राधान्यक्रमात सर्व प्रथम आहे. याच अनुषंगाने  संजीवनी फाऊंडेशन व रोटरी क्लब  ऑफ कोपरगांव  सेंट्रल  व संजीवनी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांपासुन ते महिला व पुरूष  वर्गांसाठी सायकल चालविण्याचा ‘व्हर्चुअल सायक्लोथाॅन’ हा उपक्रम आयोजीत केला आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला असुन सर्वांनी मिळुन  १०,५६५  किमी अंतर कापले.

संजीवनी फाऊंडेशनचे अध्यक्ष  अमित कोल्हे, सचिव  सुमित कोल्हे, रोटरी क्लब ऑफ  कोपरगांव सेंट्रलचे अध्यक्ष  रोहीत वाघ व सचिव  विरेश  अग्रवाल यांच्या संकल्पनेतुन हा उपक्रम राबविण्यात आला. हेल्थ पार्टनर म्हणुन ७० वर्षांची विश्वसनीय  परंपरा असलेले कोपरगांवचे जयहिंद सायकल मार्ट यांनी काम पाहीले. सर्व प्रथम नाव नोंदणीसाठी वेगवेगळ्याा सामाजिक माध्यमांद्वारे उपक्रमाची माहिती व लिंक देण्यात आली होती. सहभागी मुलींसाठी ३ किमी, मुलांसाठी ५ किमी, महिलांसाठी ५, १० आणि २० किमी व पुरूशांसाठी १०, २० आणि ५० किमी अंतर सायकलवर कापण्याचे उद्दिष्ट  होते. उपक्रमात भाग घेणाऱ्याने  हव्या त्या मार्गावर कोठेही सायकल चालवुन सायकलींगचा स्क्रीन शॉट  मोबाईलवर व्हाट्सअपला पाठवायचा होता. या उपक्रमात राज्यातील विविध भागातुन कोविड १९ ची मार्गदर्शक  तत्वे पाळून सहभाग नोंदविण्यात आला. या सर्वांना त्वरीत ई-प्रमाणपत्र देण्यात आले.
बालकांनी सुध्दा या उपक्रमात उत्साहाने सहभागी होवुन आनंदही लुटला. सर्वात कमी वय असणाऱ्या  ५ वर्षांच्या शिवांश  सुमित कोल्हे यानेही ५  किमी अंतर कापुन अनेकांच्या कौतुकाचा मानकरी ठरला. या उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केले असुन शारीरिक  तंदुरूस्तीसाठी सायकलिंग हा उत्तम व्यायाम प्रकार असल्याचेही अनेकांनी सांगीतले. आम्हाला सायकल चालविण्याची सवय राहीली नव्हती परंतु व्हर्चुअल सायक्लोथाॅनमुळे गोडी लागली असुन आपण किती फिजिकली फिट आहोत, याचेही आत्मपरीक्षण करता आले.

Leave a Reply

You cannot copy content of this page