शाळकरी अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग
Debauchery
वृत्तवेध ऑनलाइन।Tue Oct6,2020
by:RajendraSalkar,18.00
कोपरगाव : शहरातील गजानन नगरात राहणा-या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीने केलेल्या तक्रारीवरून पोलिस आरोपीच्या शोधात आहेत.
सोमवारी (५) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास फिर्यादी मुलगी हि तीचे घरी एकटी असतांना आरोपी नकुल धर्मराज ठाकरे रा. (२३) गांधीनगर याने घरात घुसून मुलीचा हात धरुन जवळ ओढुन मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन
तिचा विनयभंग केला,हे जर कोणाला सांगीतले तर तुला व तुझ्या आईला जिवंत ठेवणार नाही. असा दम देवुन शिवागाळ केली, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी विरोधात भा.द.वि. कलम ३५४,३५४ (अ), ५०४,५०६ तसेच पोस्को.का.क. ८,१२, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई. भरत नागरे तपास करीत आहेत.





