खरी माहिती द्या, अँटीजन टेस्ट करून तालुका कोरोनामुक्त  करा- आ. आशुतोष काळे

खरी माहिती द्या, अँटीजन टेस्ट करून तालुका कोरोनामुक्त  करा- आ. आशुतोष काळे

  वृत्तवेध ऑनलाइन।Tue Oct6,2020
By:RajendraSalkar,18.30  

कोपरगाव:  “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेच्या माध्यमातून सकारात्मक परिणाम पुढे आले आहेत.  कोरोनाची सौम्य व तीव्र लक्षणे असणाऱ्या नागरिकांच्या जास्तीत अँटीजन टेस्ट गरजेचे आहे त्यामुळे  कोपरगाव तालुका कोरोनामुक्त होईल खरी माहिती सांगावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

              आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तहसील कार्यालय येथे सोमवार (दि.५) रोजी कोपरगाव तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेचा आढावा घेतला याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुरु केलेल्या “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रत्येक घरापर्यंत जावून त्या घरातील कुटुंबाच्या आरोग्याची माहिती घेत आहेत. त्या माध्यमातून कोरोनाची लक्षणे जाणवत असणाऱ्या नागरिकांवर तातडीने उपचार होत आहेत. मात्र दुर्दैवाने काही नागरिकांच्या घरी आजारी व्यक्ती असून देखील नागरिक खरी माहिती देत नसल्यामुळे अशा नागरिकांना अचानकपणे त्रास वाढून हे नागरिक कोरोनाबाधित असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता पुढे येवून कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यास स्वतःहून तपासणी करून घेतल्यास आपले, आपल्या कुटुंबाचे व आपल्या तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहून कोपरगाव तालुका कोरोनामुक्त होण्यास मदत होईल. त्यासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेच्या माध्यमातून आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. आशा गटप्रवर्तक, आशा सेविका, आरोग्य सेविका व आरोग्य विभागाचे कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे या मोहिमेच्या माध्यमातून आपली जबाबदारी उत्कुष्टपणे पार पाडत असल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी विशेष कौतुक केले. सर्व कुटुंबांची तपासणी करून एकही कुटुंब आरोग्य तपासणीतून सुटणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.
              यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, सभापती सौ. पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते, डॉ.सौ.वैशाली बडदे, डॉ. गायत्री कांडेकर, आशा गटप्रवर्तक, आशा सेविका व आरोग्य सेविका उपस्थित होत्या

Leave a Reply

You cannot copy content of this page