माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या  वाढदिवशी पावणेतीन कोटीच्या सभागृहाचे लोकार्पण

माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या  वाढदिवशी पावणेतीन कोटीच्या सभागृहाचे लोकार्पण

Dedication

वृत्तवेध ऑनलाइन।Fri Oct9,2020
By: RajendraSalkar,8.30

कोपरगाव : तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांचा आज वाढदिवशी त्यांच्या कार्यकाळातील निधीतून उभारण्यात आलेल्या २ कोटी ७५ लाख खर्चाच्या सामाजिक सभागृहांचे लोकार्पण तर स्वयंसहायता बचत गटांना ३३ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले.

कोरोना विषाणू संसर्गामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कोपरगाव शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच कोपरगाव औदयोगिक वसाहतीचे चेअरमन विवेकभैया कोल्हे यांच्या उपस्थितीत पुणतांबा येथे सिंहराजे ग्रुपच्या वतीने आयोजित केलेले रक्तदान शिबीर पार पडले. तसेच संजीवनी युवा प्रतिष्ठाणच्या वतीने कोकमठाण येथील गोशाळेत हिरव्या चा-याचे वितरण केले. तर तालुक्यातील विविध महिला बचत गटांना सौ रेणुका विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते स्वयंसहायता महिला बचत गटांना रूपये ३३ लाखाचे कर्जवितरण करण्यात आले.

कोपरगाव शहरातील जुने कब्रस्थान येथे वृक्षाची लागवड करुन पर्यावरणाचा संदेश देण्यात आला, तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिका-यांनी शहरातील विघ्नेश्वर चौकात मास्कचे वाटप केले. एस. एस. जी. एम. कॉलेज येथील कोविड सेंटर मध्ये शहर भाजपाच्या वतीने कोरोनाबाधित रूग्णांना फळांचे वाटप तसेच वाफेच्या मशिनचे वितरण करण्यात आले.

मतदार संघातील वाकडी, जळगाव, मुर्शतपूर, चांदगव्हाण, डाउच बु, जेउर कुंभारी, घारी, डाउच खु, चांदेकसारे, वेस, देर्डे को-हाळे, उक्कडगाव, वारी, कोकमठाण,धामोरी, मोर्वीस , वडगाव, सोनारी, मायगाव देवी, सुरेगाव, रवंदे आदी गावात सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळातील मंजुर निधीतून उभारण्याच्या आलेल्या सुमारे २ कोटी ७५ लाख खर्चाच्या सामाजिक सभागृहाचे भुमिपूजन व लोकार्पण सौ कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्थानिक कार्यकर्ते व नागरीकांच्या हस्ते करण्यात आले.

सौ. स्नेहलता कोल्हे या कोरोनाबाधित असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत, त्यांना स्वास्थ लाभावे, त्या आजारातून लवकर ब-या व्हाव्यात यासाठी तालुक्यातील विविध मंदिरात आरती, अभिषेक आणि पुजापाठ करण्यात आले. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शरदराव थोरात, भारतीय जनता पार्टीच्या अनुसुचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे, जिल्हा सचिव कैलास खैरे, रविंद्र पाठक, विजय आढाव, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले भारतीय जनता युवा मोचोचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे, शहराध्यक्ष वैभव आढाव, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष योगिता होन, शहराध्यक्ष शिल्पा रोहमारे, धनंजय जाधव, सुहास वहाडणे, बाळासाहेब नरोडे, राजेंद्र सोनवणे, दादा नाईकवाडे, रविंद्र रोहमारे, गोपीनाथ गायकवाड, गोपी सोनवणे, चंद्रकांत वाघमारे, अल्ताफ कुरेशी,आरिफ कुरेशी, विवेक सोनवणे, जनार्दन कदम, मौलाना हाफीज सोहेल, खान सर, मुक्तार सर, सददामभाई सय्यद, अकबर लाला शेख, फिरोज पठाण, निसारभाई शेख, खालीकभाई कुरेशी, फकिरमहंमद पहिलवान, रहिमभाई शेख, जुबरेभाई खाटीक, आसिफभाई शेख, शकील अत्तार, सलीम पठाण, आकीश बागवान,सादिक पठाण, इलियास खाटीक, फारूक शेख, दादाभाई अत्तार, रफिक कुरेशी, अब्बास मनियार, अन्नु सय्यद, अन्वर खाटीक, सलमान कुरेषी, खलील शेख, मुन्ना शेख, जावेदभाई अत्तार, अब्रार अत्तार,
आदीसह भारतीय जनता पार्टी व संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक,कार्यकर्ते व नागरीकांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

You cannot copy content of this page