कोपरगाव रविवार बंदचा निर्णय मागे घेतला – योगेश चंद्रे

कोपरगाव रविवार बंदचा निर्णय मागे घेतला – योगेश चंद्रे

आता आठवडाभर दुकाने सुरू राहतील

वृत्तवेध ऑनलाइन।Fri Oct9,2020
By: RajendraSalkar,16.00

कोपरगाव : रविवार बंदचा निर्णय मागे घेण्यात आल्याने रविवार लॉकडाऊनही संपला, आता रविवारी ही बाजारपेठ पूर्वीसारखी सुरु राहणार असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

यापूर्वी कोविड -१९ चे संक्रमण पाहता जिल्हाधिकारी यांचे प्रसिद्ध झालेल्या रविवारीचे लॉक डाऊनही बंद झाले आहे. म्हणजेच आता रविवारी बाजारपेठा पूर्वीप्रमाणेच खुली असतील. रविवारचा बंद मागे घेण्यात यावा यासाठी व्यापारी महासंघ, व्यापारी संघर्ष समिती व शिवसेना यांनी सणासुदीचे दिवस असल्याने छोटे-मोठे व्यापारी व्यावसायिक यांच्यासाठी दुकानांची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासाठी परवानगी मिळत नव्हती. याबाबत उलटसुलट बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला होता. या प्रकरणी तहसीलदार चंद्रे यांनी संबंधितांना चांगलेच फैलावर घेतले होते.
रविवार बंद मागे घेण्यात आल्या बद्दल आज शुक्रवारी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले येत्या ११ तारखेच्या रविवार पासून बंद मागे घेण्यात आला असून छोटे बेटे व्यावसायिक – दुकानदारांसाठी ची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हीच राहणार आहे तर रेस्टोरेंट व बार यांच्यासाठी रात्री दहा वाजेपर्यंत मुदत वाढ करण्यात आली असल्याची माहिती दिली.

बरेच व्यवहार पूर्वीसारखे सुरळीत झाल्याने रविवार हा सुट्टीचा दिवस असतो त्या दिवशी लोक खरेदीसाठी बाहेर पडतात रविवार बंद मागे घेण्यात आल्यामुळे त्यामुळे व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.

चौकट
गेल्या आठ-नऊ महिन्यापासून कोरोनामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची व दुकानदारांची मोठी ससेहोलपट झालेली आहे. आर्थिक अडचणीत आल्याने प्रपंचाचा मोठा प्रश्‍न उभा ठाकला आहे. कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात आल्याने व दिवाळी सण तोंडावर असल्याने या छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी सकाळी नऊ ते  रात्री नऊ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी अशी मागणी शिवसेना नगर उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख कलविंदर दडियाल यांनी केली होती . याबाबत त्यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांना जिल्हाधिकारी यांच्याशी बोलण्याची विनंती केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page