कोपरगाव पिपल्स बँकेचे कर्मचारी व ग्राहकांसाठी धडाकेबाज निर्णय ; कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस, तर ग्राहकांसाठी कर्जावरील व्याजदर कमी
Kopargaon People’s Bank Shocking decisions for employees and customers; 20% bonus for employees and lower interest rates for customers
निव्वळ नफा २ कोटी ८७ लाख
वृत्तवेध ऑनलाईन | 10 Oct 2020,
By: Rajendara Salkar 14.00
कोपरगाव : अहमदनगर जिल्हयातील नामांकीत बँक म्हणून नावलौकिक असलेल्या येथील कोपरगाव पिपल्स को ऑपरेटिव्ह बँकेने दिवाळीपूर्वीच आपल्या सेवकांना २० टक्के बोनस व सानुग्रह अनुदान व अडीच लाख रुपयांचे कोविड विमा कवच ,तर कर्जावरील व्याजदर कमी करून व्यावसायिक कर्जासाठी ९ टक्के, सोने तारण ८.५० टक्के गृहकर्जासाठी १० टक्के केला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन अतुल धन्नालाल काले यांनी दिली.
अतुल काले म्हणाले, मार्च, २०२० अखेर बँकेकडे ५४८.३५ लाख भांडवल,ठेवी २६६ कोटी ४७ लाख, कर्ज वाटप
१२४ कोटी ९४ लाख, गुंतवणूक १६२ कोटी १३ लाख व सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा २ कोटी ८७ लाख इतका आहे. बँकेने नुकतेच नवीन अद्यावत सॉफ्टवेअर प्रणाली घेतली आहे. याचा निश्चितच ग्राहकांना तत्पर सेवा देण्यास फायदा होणार आहे.
बँकेने दरवर्षीप्रमाणे सेवकांना २० टक्के बोनस व सानुग्रह अनुदान तसेच सध्याचे कोविडची परिस्थिती विचारात घेता सेवकांचा २.५० लाखाचा विमा कवच घेण्यात आला आहे. बँकेने कर्जावरील व्याजदर कमी करुन व्यावसायीक कर्ज ९ टक्के सोनेतारण कर्ज ८.५०, व गृहकर्ज १० टक्के करण्यात आल्याचे ही चेअरमन अतुल काले यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या बैठकीत चेअरमन अतुल काले, व्हाईस. चेअरमन प्रतिभा शिलेदार, संचालक रतनचंद ठोळे, डॉ. विजय कोठारी ,कैलासचंद ठोळे, सुनिल कंगले, रवींद्र लोहाडे, धरमचंद बागरेचा, कल्पेश शहा, राजेंद्र शिंगी, सुनील बंब, सत्येन मुंदडा, वसंत आव्हाड, यशवंत आबनावे, हेमंत बोरावके, रविंद्र ठोळे, प्रभावती पांडे, जनरल मॅनेजर दीपक एकबोटे उपस्थित होते.
बँक सेवकांचे युनियन तर्फे प्रदीप नवले, सेवक प्रतिनिधी विरेश पैठणकर व अशोक पापडीवाल यांनी सर्व संचालकांचे आभार मानले.