शहीद सुनील वलटे यांचे स्मारक तरूण पिढीला प्रेरणादायी – आ. आशुतोष काळे
वृत्तवेध ऑनलाईन | 11 Oct 2020,
By: Rajendara Salkar 19.30
कोपरगाव : देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असतांना कोपरगाव तालुक्याचे सुपुत्र वीर जवान नायब सुभेदार सुनील वलटे मागील वर्षी अतिरेक्यांबरोबर झालेल्या चकमकीत शहीद झाले. त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानातून व त्यांनी दाखविलेल्या शौर्य तरूण पिढीला प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी शहीद वीर जवान नायब सुभेदार सुनील वलटे यांच्या स्मारकाचे अनावरण प्रसंगी केले.
आ. काळे म्हणाले, दहेगाव बोलका ग्रामस्थांनी त्यांचे स्मारक उभारले हे खरोखर अभिमानास्पद आहे. शहीद वीर जवान नायब सुभेदार सुनील वलटे यांच्या बलिदानामुळे कोपरगाव तालुक्याने शूर भूमिपुत्र गमावला असून त्यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही असेही ते म्हणाले. स्मृतिदिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली .
यावेळी श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने शहीद जवान वलटे यांच्या कुटूंबियांना ५०,००० रुपयांचा धनादेश आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल कटके, कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, जिनिंग चेअरमन गोरक्षनाथ जामदार, रायु कां तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, विरपिता रावसाहेब वलटे, वीरमाता सौ. सुशीलाताई वलटे, वीरपत्नी मंगलताई वलटे, भाऊ अनिल वलटे, मुलगा वेदांत वलटे, जगन बागल, अनिल वलटे, अशोक भोकरे, भास्कर वलटे, रावसाहेब आभाळे, गुलाबराव देशमुख, आबा रक्ताटे व ग्रामस्थ उपस्थित होते.