आक्रोश – भाजपाची कामगिरी: महिला
अत्याचाराविरोधात भाजपाचा निषेध
वृत्तवेध ऑनलाईन | 12 Oct 2020,
By: Rajendara Salkar 15.30
कोपरगाव : राज्यात महिला छळाच्या घटनांच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी (१२) रोजी तहसील कार्यालयावर आंदोलन केले. भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष योगिता होन,शहराध्यक्ष शिल्पा रोहमारे, यांनी नायब तहसिलदार मनिषा कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रामधील अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. कोरोनातही कोविड सेंटर व हाॅस्पिटलमध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंग सुरूच आहे. सामूहिक बलात्कार आणि बलात्काराच्या घटनांमुळे महिला व मुली स्वत: ला असुरक्षित मानू लागल्या आहेत.यासाठी राज्य सरकारने महिला सुरक्षितते संदर्भात कडक कायदे करावेत, .
महाराष्ट्र प्रदेश,भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चाने या महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनांचा पाठपुरावा केलेला आहे.पीडीत महिलांच्या कुटूंबियांनी स्थानिक पोलीस स्टेशनला भेट देउन वेळोवेळी कारवाईची मागणीही केलेली आहे.परंतु सदर घटनासंदर्भात सरकारला गांभीर्य नसल्याचे दिसून आले.यावरून या महाविकास आघाडी सरकारची महिला सुरक्षितेबाबतची असंवेदनशीलता आणि निष्क्रियता दिसून येते .या सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नसल्याचा आरोप करण्यात आला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार महिलांचे रक्षण करण्यात पुर्णपणे अपयशी ठरले असून या आघाडी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत, महाविकास आघाडी सरकारने महिलाविषयीची बेफिकीरीचा दृष्टीकोन सोडून महिला सुरक्षिततेबाबत त्वरीत कडक कायदे बनविण्यात यावे,अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा कार्यकारणी सदस्या विनिता भिंगारे, अलका परजणे, निकिता चौधरी, पंचायत समिती सदस्या सुनीता संवसरकर, राजश्री कोळपकर, नगरसेविका दीपा गिरमे, मंगल आढाव, विद्या सोनवणे, सुवर्णा सोनवणे, ताराबाई जपे, कांचन दरपेल, मंजूश्री गोयल आदींसह भारतीय जनता पार्टी चे शहर व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थीत होते.