राष्ट्रीय ऑनलाईन वादविवाद स्पर्धेत संजीवनी अकॅडमी प्रथम -सौ. मनाली कोल्हे

राष्ट्रीय ऑनलाईन वादविवाद स्पर्धेत संजीवनी अकॅडमी प्रथम -सौ. मनाली कोल्हे

अंजली अनिल कारवा प्रथम

वृत्तवेध ऑनलाईन | 12 Oct 2020,
By: Rajendara Salkar 16.30

कोपरगांव: एन्टॅब या स्कूल मॅनेजमेंट सिस्टिमचे साॅफ्टवेअर पुरविणाऱ्या कंपनीनेे राष्ट्रीय पातळीवर ‘हॅज फेमिनिझम गाॅन टू फार?’ या स्त्रीयांचे समान हक्क, मानसन्मानाशी निगडीत विषयावर ऑनलाईन वादविवाद स्पर्धा घेतली, यात संजीवनी अकॅडमीच्या अंजली अनिल कारवा हीने विषयाच्या प्रवाहात बाजु मांडुन देश पातळीवर प्रथम क्रमांक मिळविला तर संस्कृती दिलीप पाटील हीने विषयाच्या प्रवाहाच्या विरोधात बाजु मांडून परीक्षकांची वाहवा मिळविली. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची विजयी घौडदौड सुरूच असुन स्कूलचे सर्वगुण संपन्न विदयार्थी घडविण्याचे उद्दिष्ट सफल होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, अशी माहिती संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात सौ. कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की एन्टॅब मार्फत विध्यार्थ्यांमधील सृजनशिलतेला व प्रतिभासंपन्नतेला सिध्द करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने वादविवाद स्पर्धेत महाराष्ट्रातून विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, परंतु कंपनीच्या विविध निकषांच्या आधारे आणि प्रवेश चाचणीमध्ये संजीवनीच्या फक्त अंजली आणि संस्कृतीची निवड झाली, त्यात अंजलीने प्रथम क्रमांक मिळवुन संजीवनी अकॅडमीचे नाव पुन्हा एकदा देश पातळीवर अधोरेखित केले. या ऑनलाईन स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धकाला आपले मत मांडण्यासाठी सात मिनिटे देण्यात आली होती व त्यानंतर परीक्षकांनी प्रश्न विचारले. ही स्पर्धा यु ट्यूब वरून लाईव्ह दाखविण्यात आली होती. अनेक प्रेक्षकांनीही अंजली व संस्कृतीचे नंतर कौतुक केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, सौ. मनाली कोल्हे यांनी गुणवंत विध्यार्थींनींचे तसेच प्राचार्या सौ. सुंदरी सुब्रमण्यम व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page