आत्मा मालिक ध्यान पीठात ; ३ ते ५ जुलै, ऑनलाइन गुरु पौर्णिमा उत्सव-नंदकुमार सुर्यवंशी

आत्मा मालिक ध्यान पीठात ; ३ ते ५ जुलै, ऑनलाइन गुरु पौर्णिमा उत्सव-नंदकुमार सुर्यवंशी

गुरुपौर्णिमा काळात आवागमन बंद

कोपरगाव:

तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यान पीठात कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर यावर्षी तीन ते पाच जुलै दरम्यान ऑनलाइन गुरु पौर्णिमा उत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी झूम पत्रकार परिषदेत दिली.

श्री. सूर्यवंशी म्हणाले, ओम गुरुदेव माऊलींच्या उपस्थितीत तीन ते पाच जुलै दरम्यान दररोज ध्यान काकड आरती भजन संध्या प्रवचन कीर्तन सेवा आत्मबोध प्रबोधन तसेच हरिपाठ प्रमोद व सविता नायगावकर यांची भजन सेवा सत्संग पंढरपूर येथून चंदाताई तिवाडी यांची भारुड सेवा महा आरती आदी नित्यनियम कार्यक्रम दररोज होणार आहेत.

या कार्यक्रम प्रसंगी संत परमानंद महाराज विवेकानंद महाराज पठारे महाराज कबीर आनंद महाराज पंडित आनंद महाराज हनुमंतराव भोंगळे प्रकाश मेहता केदार सारडा व पुण्याचे शाकाहार तज्ञ डॉ. कल्याण गंगवाल आदी मान्यवर सहभागी होणार असून भाविकांना ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. भाविक भक्तांनी या गुरुपौर्णिमा उत्सवात ऑनलाइन सहभागी व्हावे असे आवाहन संत परिवार व विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

चौकट

कोकमठाण तालुका कोपरगाव येथील आत्मा मालिक ध्यानपीठ दरवर्षी राज्यभरातून परराज्यातून सुमारे दोन ते अडीच लाख भाविक दर्शनासाठी येत असतात मात्र यावर्षी कोरोना महामारी मुळे ओम गुरुदेव माऊलींचे ऑनलाईन दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले असून कोणीही दर्शनासाठी आश्रमात येऊ नये, आश्रमाच्या आतील लोकांना बाहेर जाण्याची परवानगी नाही तर बाहेरील लोकांना आश्रमात येण्याची कोणतीही परवानगी दिली जाणार नाही असे सूर्यवंशी यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page