अपंग योजनांचा आढावा घेऊन जमेल ती मदत करू – दडियाल

अपंग योजनांचा आढावा घेऊन जमेल ती मदत करू – दडियाल

Disability planning

वृत्तवेध ऑनलाईन | 14 Oct 2020,
By: Rajendara Salkar 15.30

कोपरगाव : शिवसेना सदैव कोपरगावातील अपंगांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील.राज्य शासनाच्या विविध अपंग योजनांचा आढावा घेऊन जमेल ती मदत करू असे आश्वासन शहर प्रमुख कलविंदर दडियाल यांनी शिवसेना अपंग सहाय्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या समस्यांवर बोलताना दिले.

कलविंदर दडियाल म्हणाले, भारताच्या राज्यघटनेनुसार सर्व नागरिकांना समता, स्वातंत्र्य, न्याय आणि प्रतिष्ठेचे आश्‍वासन देण्‍यात आले आहे व ह्यामध्ये अपंग नागरिकांचाही अर्थातच निर्विवाद समावेश आहे. तसेच घटनेनुसार अपंगांच्या सक्षमीकरणाची थेट जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवण्यात आली आहे.अपंग व्यक्तींना उपकरणे अथवा साहित्य खरेदीसाठी व उभारणीसाठी मदत करू(एडीआयपी योजना) ह्या योजनेचा मुख्य उद्देश आहे गरजू अपंग व्यक्तींना आधुनिक, टिकाऊ व शास्त्रीय उपकरणे व इतर साहित्य उपलब्ध करून देणे ज्यायोगे त्यांच्या वास्तविक, सामाजिक व मानसिक पुनर्वसनास मदत होईल, ते अपंग असल्याचा त्यांच्या जीवनशैलीवर होणारा परिणाम कमी होईल व त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. असेही दडियाल यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अपंग सहाय्य सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब लांडे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पारखे, कार्याध्यक्ष किशोर हिवरे, संतोष जगधने, रामनाथ औताडे, मुजिम शेख, वाहतूकसेनेचे इरफान शेख,विशाल झावरे,विभागप्रमुख विजय शिंदे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page