प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाचा डिजिटल नवरात्र उत्सव – चैताली काळे
वृत्तवेध ऑनलाईन | 14 Oct 2020,
By: Rajendara Salkar 16.00
कोपरगाव : आमदार आशुतोष काळे व सौ.चैताली काळे यांच्या संकल्पनेतील डिजिटल नवरात्र उत्सव प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैताली काळे यांनी दिली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना चैताली काळे म्हणाल्या, शनिवार (दि.१७) पासून सुरु होणा-या नवरात्र उत्सवानिमित्त महिला भगिनींसाठी अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून ऑनलाईन पद्धतीने महिला या स्पर्धेमध्ये भाग घेवू शकतात. यामध्ये कोरोना वॉरीअर्स या विषयावर रांगोळी स्पर्धा, नाविन्यपूर्ण उपवासाचे पदार्थ तयार करतांना व्हिडीओ तसेच महिलांचा सर्वात आवडता ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात देखील महिलाभगिनी घरबसल्या सहभागी होवून पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने दांडिया प्रशिक्षण व महिलांना स्वरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. कोपरगाव तालुक्यातील सर्व देवींच्या मंदिराची माहिती, नवरात्रीच्या नऊ दिवसांचे धार्मिक महत्व, विविध दुर्गारुपांचे सादरीकरण, कुंकुमआर्चन, देवीचे पाठ, भजन आदी कार्यक्रम
शासनाने दिलेल्या नियमांप्रमाणे डिजिटल पद्धतीने घरात राहूनच साजरा
होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
रोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत आमदार आशुतोष काळे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सर्व महिला भगिनींनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन या कार्यक्रमाचा आस्वाद असे आवाहन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी केले आहे.