डाऊच फाटा येथे शिवसैनिक व शिवराणाप्रताप ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी तीन गायीची सुटका
वृत्तवेध ऑनलाईन | 14 Oct 2020,
By: Rajendara Salkar 16.30
कोपरगाव: बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कोपरगांव येथून झगडेफाटा दिशेने काळ्या रंगाच्या होंडा सिटी कार मधुन ३ गौवंश घेऊन जात असल्याची माहीती शिवसेनेचे सरपंच संजय गुरसळ यांना मिळाली.
गावातील शिवसैनीक, शिवराणा ग्रुप स्वयंसेवक,पोलीस गणेश मैड, शैलेंद्र ससाने, श्ररी काळे , राजू होन, देवा पवार, गणेश बारसे निलेश पुगळ हर्षल पंकज पुगळ अदि यावेळी उपस्थित होते.
आपला पाठलाग होत असल्याचे लक्षात आल्यानंतर गोवंश नेत असलेल्या लोकांनी या गाई रस्त्यावर उतरून देत तेथून वाहनासह पळ काढला. सदर वृत्तांत संजय गुुुुरसळ यांनी पोलीस स्टेशनला कळल्यानंतर कारवाई करण्यात आली. कोपरगांव शहर पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन ३ गौवंश ताब्यात घेऊन सर्व गाई गोकुळ धाम गौरक्षा केंद्र कोकमठाण येथे सुखरूप सोडण्यात आले.३ही गौवंशाला नशेचे पदार्थ खायला घालुन हा प्रकार होत असल्याची चर्चा सध्या परिसरात चालू आहे.