शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी शेतीमाल बाजार समितीत विकावा – संभाजी रक्ताटे

शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी शेतीमाल बाजार समितीत विकावा – संभाजी रक्ताटे

वृत्तवेध ऑनलाईन | 14 Oct 2020,
By: Rajendara Salkar 17.30

कोपरगाव : शेतीमाल विक्रीतील खेडा खरेदी व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा असे आवाहन सभापती संभाजी रक्ताटे यांनी केले आहे.

तालुक्यात काही खाजगी व्यापार्‍यांनी आपले काटे उभारून खरेदी सुरू केली आहे. परंतु यामध्ये काटामारी व प्रतवारी कमी दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे बाजार समितीच्या निदर्शनास आले असून अशा व्यापार्‍यावर कारवाई सुरू आहे. परंतु शेतकऱ्यांनी ही फसवणूक टाळण्यासाठी आपला सोयाबीन व भुसार शेतीमाल बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा असे आवाहन करण्यात आले आहे. बाजार समितीमध्ये उघड उघड बोली लिलाव होत असल्याने शेतकऱ्यांना उंची भाव मिळत असल्याचे उपसभापती राजेंद्र निकोले यांनी म्हटले आहे.

बाजार समितीमध्ये हमाली व तोलाई वजा जाता कुठलीही पट्टी कपात केली जात नाही, तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना शोधण्यासाठी भरारी पथक नेमण्यात आले असल्याची माहिती सभापती संभाजी रक्ताटे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांनी आपला शेती व भुसार माल तसेच सोयाबीन बाजार समितीमध्ये विक्री आणावे हे आवाहन बाजार समितीच्या वतीने सचिव नानासाहेब रणशूर यांनी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page