पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पी. एम. केअर द्वारे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर मिळाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पी. एम. केअर द्वारे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर मिळाले

वृत्तवेध ऑनलाईन | 14 Oct 2020,
By: Rajendara Salkar 18.00

कोपरगाव : संजीवनी उद्योग समूहाने पी एम केअर फंड साठी ७.५ लाख व सी एम केअर फंड साठी ७.५ लाख अशी एकूण १५ लाख रुपयांची मदत केली आहे अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष दत्तात्रय काले यांनी दिली.

कोपरगाव मध्ये ग्रामिण रुग्णालय व्हावे यासाठी कित्येक वर्षे अगोदर माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी प्रयत्न करून गोर गरीब कष्टकरी जनतेची उपचारासाठी सुविधा व्हावी यासाठी ग्रामीण रुग्णालयात सुविधा निर्माण करून ठेवली जी या संकटात सर्वांसाठी उपयोगी ठरत आहे.

प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही विशेष प्रयत्न करून त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण रुग्णालयासाठी निधी मिळवला.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी तहसीलदार .योगेश चंद्रे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर व त्यांचे सहकारी यांचेही हे व्हेंटिलेटर मिळावे यासाठी पाठपुरावा केला आहे

चौकट
येत्या शुक्रवार दिनांक १६ पासून ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय सेंटर सुरू करण्यात येणार असून गंभीर रुग्णाला आता तातडीने ऑक्सिजन देण्यासाठी हे मशीन व्हेंटिलेटर उपयोगी पडणार आहे अशी माहिती डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली

Leave a Reply

You cannot copy content of this page