कोरोनामुळे यंदाचा चास (नळी) येथील जगदंबा मातेचा नवरात्रोत्सव रद्द
शेकडो वर्षांची परंपरा खंडित
वृत्तवेध ऑनलाईन | 15 Oct 2020,
By: Rajendara Salkar 13.00
कोपरगाव : जगदंबेच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक असलेल्या व श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती यांचे एकत्रित रूप असलेल्या चास नळी येथील जगदंबा मातेचा नवरात्रोत्सव कोरोनामुळे यंदा रद्द करण्यात आला आहे.यामुळे शेकडो वर्षांची परंपरा खंडीत झाली आहे. अशी माहिती येथील गुरव पुजारी रमेश शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना गुरव पुजारी रमेश शिंदे म्हणाले सर्व भाविकांच्या नवसाला पावणारी व निशश्रकाला शक्ती देणारी जगदंबा मातेचे स्वयंभू अधिष्ठान असलेली
कोपरगांव तालुक्यातील चास नळी गावचे ग्रामदैवत माता जगदंबा देवीच्या नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसाच्या कालावधीत शेकडो भाविक घटी बसतात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. सर्व जण मातेच्या दर्शनासाठी आतुर झालेले असतात. नवरात्रोत्सव काळात शेकडो महिला पहाटे दुर्गा सप्तशती पारायण करतात व घरातील प्रत्येक जण नऊ दिवस घटी बसतात व भजन कीर्तनाचा कार्यक्रम असतो तसेच अबाल वृध्दा़पासुन ते गरीबांपासुन श्रीमंतापर्यंत सर्व धर्मीय मनोभावे प्रार्थना करतात व आशिर्वाद घेतात. मात्र यंदा कोरोनाचा कहर सुरूच असल्याने शासनाच्या आदेशानुसार मंगळवारी (१३) रोजी सायंकाळी साडे सात वाजता झालेल्या बैठकीत कोपरगांव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कटके व सर्व ग्रामस्थांची बैठक घेऊन नवरात्रोत्सव रद्द करण्याचा एक मुखाने निर्णय घेतला असून या काळात नऊ दिवसात देवी मंदिरात सकाळ व संध्याकाळी मंदिर पुजारी व पाच ग्रामस्थांच्या उपस्थिती मध्ये देवीची पूजा अर्चा शासनाच्या आदेशानुसार सोशल डिश्टन्सचे पालन ठेवून करण्यात येणार आहे. प्रत्येक भाविकाने आपल्या घटाची स्थापना मंदिरात न करता आपआपल्या घरी स्थापना करावी असे आवाहन शासनाच्या वतीने ग्रामस्थ व भाविकांना गुरव पुजारी रमेश शिंदे यांनी केले आहे .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अद्याप मंदिरे सुरु करण्यास परवानगी दिली नसल्याने येथे नवरात्रोत्सव काळात नियोजन संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीस कोपरगांव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कटके ,पोलीस पाटील प्रकाश शिंदे, गणपतराव चांदगुडे, विकासराव चांदगुडे, सुभाषराव गाडे, ह.भ. प. बाबुराव महाराज चांदगुडे, संजय चांदगुडे, ज्ञानेश्वर शिंदे, मनोज गाडे, मच्छिंद्र शिंदे, नानासाहेब बनसोडे, शिवदत्त गाडे , दिलीप चांदगुडे, प्रभाकर आहेर, बाळासाहेब शिंदे आदि उपस्थित होते.