घराच्या जागेच्या वादावरुन मारहाण; तीन जखमी, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

घराच्या जागेच्या वादावरुन मारहाण; तीन जखमी, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कोपरगाव

गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आरोपी यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून घराच्या जुन्या जागेच्या वादावरुन मारहाण केली यात तीन जण जखमी झाले असून यात दोन मुलांचा समावेश आहे याप्रकरणी सात जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी (२ जुलै) रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास संजय नगर येथे शंकर रमेश गुंजाळ याच्या घरासमोर अशोक रामचंद्र गुंजाळ, कलाबाई बापु शिंदे, सुनिल अशोक गुंजाळ, अनिल अशोक गुंजाळ, गणेश अशोक गुंजाळ, ताराबाई अशोक गुंजाळ ,आशाबाई सुनिल गुंजाळ सर्व रा. टाकळीनाका कोपरगाव या आरोपीनी घाण घाण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व काठीने,
लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात शंकर रमेश गुंजाळ (३८वर्षं), शिवराज परशुराम गुंजाळ (१७ वर्षं), हर्षल शंकर गुंजाळ (१२ वर्षं) सर्व रा. संजयनगर, हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये
रजि. नं २४०/२०२० भादंवि कलम ३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४९
प्रमाणे वरील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. ३९१ आर. पी. पुंड हे तपास करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page