बौद्ध धर्म वर्षावास कार्यक्रम स्वतःचा घरातच करा- भारतीय बौद्ध महासभेचे आवाहन
कोपरगाव :
बौद्ध धम्माचा पवित्र आषाढ पौर्णिमा पाच जुलै ते अश्विन पौर्णिमा ३१ ऑक्टोबर पर्यंत वर्षावास मालिका कार्यक्रम सुरू झाला असून कोरोना ची पार्श्वभूमी लक्षात घेता सर्वांनी फिजिकल डिस्टन्स ठेवून भगवान बुद्ध व त्यांच्या धम्म ग्रंथाचे पठण स्वतहाच्या घरात बसूनच करा असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा यांनी केले आहे .
सद्यपरिस्थतीत मोबाइलवरुन ऑन लाइन प्रवचने देणे , प्रवचनाचे विषय ऑनलाइन पाठविणे. त्याचप्रमाणे घरातच या काळात ग्रन्थवाचन करावे . सामुदायिक ठिकाणी ,कुणाच्या घरी जाऊ नये सर्वानी कोरोना संबंधीचे नियम पाळून मास्क, सॅनिटायझर, साबण सुरक्षित अंतर ठेवून स्वत:च्या घरातून वर्षावास कार्यक्रम मालिका राबवा असे आवाहन भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाअध्यक्ष संजय खंडीझोड, संस्कार सचिव रामदास सोनवणे व कोपरगाव तालुका अध्यक्ष
पंडित भारूड ,यांनी उपासक उपासिका व पदाधिकाऱ्यांना केले आहे.





