मका पिकाला ही मिळणार विमा संरक्षण सामावेश – आमदार आशुतोष काळे
१३ हेक्टर क्षेत्रातील मका उत्पादकांना दिलासा
कोपरगाव :
कोपरगाव तालुक्याचा पंतप्रधान पीक विमा योजनेत मका पिकाचा समावेश झाल्याने कोपरगावच्या १३ हजार हेक्टर क्षेत्रातील मका उत्पादकांना दिलासा, आमच्या पाठपुराव्याचे फलित असल्याचा दावा आमदार आशुतोष काळे यांनी केला आहे.
आज पर्यंत केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त विमा कंपनी मार्फत सोयाबीन, बाजरी, कपाशी पिकांना विमा संरक्षण मिळवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत होती मक्याचा समावेश असल्याने तालुक्यातील शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहत होता पंतप्रधान विमा योजना त्याचा समावेश व्हावा यासाठी आपण सातत्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले.
पिक विमा संरक्षणामुळे नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, महापूर, रोगकिडी नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास सरकारी नियमाप्रमाणे नुकसान भरपाई मिळते. मात्र गतसाली एकीकडे मक्यावर लष्करी अळींचा हल्ला त्यात विमा कवच नसल्याने शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले होते.
मका हे चारा आणि नगदी पीक असल्याने पंतप्रधान विमा योजनेत समावेश झाल्याने मका उत्पादकांनी विमा काढून घ्यावा असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.





