आदिवासी कुटुंबासाठी महत्त्वाचा आधार असलेली खावटी योजना शेवटच्या लाभार्थीपर्यंत पोहोचवा – आ. आशुतोष काळे

आदिवासी कुटुंबासाठी महत्त्वाचा आधार असलेली खावटी योजना शेवटच्या लाभार्थीपर्यंत पोहोचवा – आ. आशुतोष काळे

महाविकास आघाडी कडून खावटी योजना पुनर्जीवित

वृत्तवेध ऑनलाईन।27Oct2020
By:Rajendra Salkar, 16:00

कोपरगाव : महाविकास आघाडी सरकारने आदिवासी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेवून २०१४ पासून बंद असलेली खावटी कर्ज योजना पुनर्जीवित केली आहे. शासनाने अनुसुचित जमातीच्या कुंटूबियांना खावटी योजने अंतर्गत शंभर टक्के अनुदान रोख व वस्तू स्वरुपात वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आदिवासी कुटुंबासाठी हा महत्त्वाचा आधार असून तो शेवटच्या लाभार्थींपर्यंत पोहचवा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी

आदिवासी योजनांचा आढावा बैठकीत तहसीलदार योगेश चंद्रे व संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

 आ. काळे म्हणाले ता,२८ जून २०१३ रोजीच्या शासन निर्णन्वये ता,२० जुले २००४ रोजीच्या शासन निर्णयातिल ५० टक्के वस्तू स्वरुपात व ५० टक्के रोख स्वरुपात, यामध्ये बदल करुन १०० टक्के रोख स्वरुपात खावटी कर्ज योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता,रोख स्वरुपातील रक्कम ही लाभार्थी कुंटूबातील महिलाच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते उघडून आरटीजीएस द्वारे भरण्यात यावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. 
  आदिवासी समाजाची दखल घेतली याबद्दल आदिवासी संघटनेने समाधान व्यक्त करून आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
 यावेळी सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे,  उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक सचिन रोहमारे, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
   या योजनेचा मनरेगावर कार्यरत असलेले मजूर, आदिम जमातीची सर्व कुटुंबे,पारधी जमातीची सर्व कुटुंबे, जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांनी निश्चित केलेली गरजू आदिवासी कुटुंबे, ज्यामध्ये घटस्फोटीत, विधवा, परितक्त्या,भूमिहीन शेतमजूर, अपंग व्यक्तीअसलेले कुटुंब व अनाथ मुलांचे  संगोपन करणारे कुटुंबे तसेच वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेली वनहक्क धारक कुटुंबाना या योजनांचा लाभ होणार आहे. त्यामुळे या खावटी योजना आदिवासी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत तातडीने कशा पोहोचतील व जास्तीत जास्त आदिवासी समाजबांधवांना या योजनेचा कसा लाभ करून देता येईल याची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. या योजनांची व खावटी योजनेची सविस्तर माहिती सांगून या योजनांचा लाभ आदिवासी बांधवाना मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे. अशा सूचना केल्या. तसेच ज्या आदिवासी बांधवांना काही अडचणी येत असतील तर त्यांनी मतदार संघातील प्रत्येक गटाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या मदतीने या योजनांचा जास्तीत समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी केले.
                     

Leave a Reply

You cannot copy content of this page