कर्मवीर काळे कारखान्याचा गुरूवारी ६६ वा गळीत हंगाम

कर्मवीर काळे कारखान्याचा गुरूवारी ६६ वा गळीत हंगाम

वृत्तवेध ऑनलाईन।27Oct2020
By:Rajendra Salkar, 16:30

कोपरगाव : सहकार क्षेत्रात अग्रगण्य कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा ६६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवार (दि.२९) रोजी सकाळी १०.०० वाजता कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक, जेष्ठ संचालक माजी आमदार अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैताली काळे यांच्या शुभहस्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी दिली आहे.

गुरुवार (२९) रोजी होणारा गळीत हंगामाचा शुभारंभ देखील मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी यांना आमदार आशुतोष काळे यांचे विचार ऐकता यावे यासाठी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण www.facebook.com/ashutosh a kale या आमदार आशुतोष काळे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर लाईव्ह पाहता येणार आहे. या कार्यक्रमाचा शेतकरी ऊस उत्पादक व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page