सोमवारचा आठवडे बाजार हा बाजार तळातच भरवा – भाजप

सोमवारचा आठवडे बाजार हा बाजार तळातच भरवा – भाजप

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन

वृत्तवेध ऑनलाईन।27Oct2020
By:Rajendra Salkar, 16:40

कोपरगाव – कोपरगाव शहरातील सोमवारचा आठवडे बाजार पुर्वीप्रमाणेच बाजारतळ येथील मैदानावर एकाच ठिकाणी भरविण्यात यावा, अशी मागणी कोपरगाव भाजपच्यावतीने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

कोपरगाव नगरपरिषद् हददीतील उपनगरांमध्ये विविध ठिकाणी भाजीपाला विक्रेते, फळे व्यापारी, किराणा व्यापारी , तसेच कपडे व्यापारी, छोटे व्यवसाय करणारे रस्त्याच्या दुतर्फा बसुन व्यवसाय करीत आहे. त्यामुळे ओट्यावर बसलेल्या व्यावसायिकांचे व्यवसाय समाधानकारक होत नसल्याने भाजीपाला व्यवसायिकांच्या मागणीचा विचार करून बाजारतळ येथे आठवडे बाजार भरविण्यात यावा, या मागणीचे निवदेन उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी मुख्याधिकारी यांना दिले.यावेळी गटनेते रविंद्र पाठक, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, शहराध्यक्ष दत्ता काले, भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे, राजेंद्र सोनवणे, आरीफ कुरेशी, वैभव गिरमे, अकबर शेख, शरद त्रिभुवन आदी उपस्थित होते.

जगासह, देशात प्रादुर्भाव होत असलेल्या कोरोना महामारीचे संकट टळलेले नाही. सोमवारचा आठवडे बाजार कै. राधुजी भांगरे बाजार ओटयावर भरविण्यास नगरपरिषदेने परवानगी दिलेली आहे. परंतु तरीही छोटे मोठे व्यावसायिक, शेतकरी विक्रेते सोमवार बाजारच्या दिवशी देखील शहरातील इतरत्र भागात बसलेले आढळतात. त्यामुळे सोमवारच्या दिवशी शहरातील व्यापारी पेठेत नागरीकांची प्रचंड गर्दी होते, वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. पर्यायाने या कोरोना महामारीच्या संकटात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होतांना दिसत नाही. सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात नाही, तसेच मास्क लावणारांची संख्या कमी असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. असेही निवेदनात नमूद केले आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page