खेळ मैदानाच्या आरक्षणाचा निकाल यांच्या अनास्थेमुळेच मालकाच्या बाजुने – विवेक कोल्हे

खेळ मैदानाच्या आरक्षणाचा निकाल यांच्या अनास्थेमुळेच मालकाच्या बाजुने – विवेक कोल्हे

वृत्तवेध ऑनलाईन।27Oct2020
By:Rajendra Salkar, 17:00

कोपरगाव : शहराच्या विकास आराखडयात सर्वे नंबर २१० आरक्षण क्रमांक ७९ मध्ये पोलीस स्टेशन व पोलीस ग्राउंड ची जागा आरक्षीत आहे. तसेच आरक्षण क्रमांक ८० हे खेळाच्या मैदानासाठी आरक्षीत आहे. मा. उच्चन्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे पिटीशन नंबर ९८३३/२०१७ अन्वये याचिका दाखल होती. परंतु पालिकेच्या दिरंगाई व अनास्थेमुळे मुळ मालकाच्या बाजुने निकाल झाला असून ते आरक्षण उठवावे यासाठी मात्र त्यांचा मोठा आटापिटा होत असल्याचा आरोप औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांनी केला आहे.

सदरची जागा नगरपालिकेस खेळाच्या मैदानासाठी आवश्यक आहे. अशी भक्कम बाजु न्यायालयात का नाही मांडली तसेच सदरची जागा खरेदी करण्यासाठी शासन स्तरावर कुठलाही पाठपुरावा का केला नाही ? मात्र मा. उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे बाबत का विचारविनीमय होत नाही ? मात्र प्रत्येक सर्वसाधारण सभेस सदरच्या आरक्षण उठवण्याबाबत विषय घेतला जातो. दुसरीकडे शहर हितासाठी नगरसेवकांनी सुचलेले विषय एकतर टाळले जातात किंवा त्यांना केराची टोपली दाखवली जाते मात्र मलीदा असलेले विषय घेतले जातात असा आरोप करून नगरपालिकेने वरील सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले.

यावेळी अमृत संजीवनी पराग संधान , कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे , शरदनाना थोरात उपजिल्हाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे , दिलीप दारुणकर , विनोद राक्षे उत्तर जिल्हाध्यक्ष नगर अनुसुचित जाती मोर्चा, शहराध्यक्ष दत्ता काले , अरुणदादा येवले , तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम , माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल , विजय वाजे , कैलास खैरे माजी शहराध्यक्ष, बाळासाहेब नरोडे, ज्ञानेश्वर परजने, बबलू वाणी, अशोक लकारे, सत्यजित मुंदडा , शिवाजी खांडेकर , दिनेश कांबळे वैभव गिरमे, दीपक जपे, आदीसह सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page