निवडणुकीत पराभव होतातच ; आमचा झाला, तसे तुमचेही झालेत की – विजय वहाडणे

निवडणुकीत पराभव होतातच ; आमचा झाला, तसे तुमचेही झालेत की – विजय वहाडणे

वृत्तवेध ऑनलाईन।27Oct2020
By:Rajendra Salkar, 19:00

कोपरगाव: नगराध्यक्षांना विधानसभेला तेराशे मते ही जनतेने दिलेली त्यांच्या अपयशाची पावती असुन तरीही त्यांनी नैतिकता स्विकारली नाही, याचे मला आश्चर्य वाटते आहे. अशा वेळी त्यांच्याकडून तो निर्णय होणे अपेक्षित होते,’ अशी टिप्पणी करून औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे ‘ यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना डिवचण्याचा सोमवारी प्रयत्न केला. निवडणुकीत पराभव होतच असतात, आमचा झाला तसा तुमच्या साहेबांचा , दादाचा, आणि ताईंचा हि झालाच आहे की, असा पलटवार नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला.

विवेक कोल्हे यांनी चार वर्षांमधील कामगिरी मांडत वहाडणेंच्या पालिका कारभारावर निशाणा साधला आहे. आणि पुन्हा एकदा नगराध्यक्ष वहाडणे यांना डिवचले आहे.

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मला मान्य आहे. मग २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील तुमचे तीस हजारांचे मताधिक्य कुठे गेले? असा सवाल करून पालिका वाचावी म्हणूनच जनतेने मला नगराध्यक्ष ठेवले असल्याचे सांगून वहाडणे म्हणाले, १० वर्षात झाली नाहीत इतकी कामे मी साडेतीन वर्षात केलेली कामे प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व जनतेला माहिती आहेत. तुम्ही नगरपरिषदेला निधी मिळू दिला नाही, कारभारात अडथळे आणले, ५ नंबर साठवण तलाव व्हावा म्हणून मी दिल्लीपासून प्रयत्न करत होतो, पण तुम्ही अडथळेच आणले. कोपरगावचे हक्काचे क्रीडासंकुल नेले, आता क्रीडांगणासाठीची राखीव जागा घ्यायचा प्रयत्न का केला नाही. हे मला विचारता, माझ्याविरुद्ध बातम्या पेरायच्या हे उद्योग बंद करा असे प्रत्युत्तर वहाडणे यांनी टीकास्त्र सोडणाऱ्या कोल्हे यांना दिलं आहे.

सर्वसाधारण सभा किती झाल्या याचा हिशोब ठेवण्यापेक्षा शहरात झालेल्या विकासकामांचा हिशोब करा. शहरातील हेम मेडिकल ते एस. जी.विद्यालय रस्ता, धारणगाव रस्ता, गुरुद्वारा रोड, छ. संभाजी महाराज चौक ते इंदिरा पथ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा, खोका शॉप इ. कामे लवकरच पूर्णत्वास जाणार आहेत. डॉ.आंबेडकर मैदानाचे व अनेक रस्त्याच्या कामाचे कार्यदेश दिलेले आहेत. पावसाळ्यामुळे कामे थांबलेली आहेत.कोपरगाव नगरपरिषदेचा स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवर वेस्ट झोन मध्ये १८ वा नंबर आला हे दिसत नाही का. तुमच्या काळात साठवण तलावातील माशाचा ठेका, जेष्ठ नेते श्री.कोल्हे साहेबांचे मार्गदर्शन-सल्ला घेतला तर फार बरे होईल. आम्ही खोका शॉपसाठी काय प्रयत्न करतोय याची माहिती घ्या, सर्व प्रभागात झालेली कामे जाऊन बघा, मग कळेल किती कामे झालेली आहेत-सुरू आहेत आणि किती प्रस्तावित आहेत. असे गेल्या चार वर्षात केलेली कामे मांडली आहेत. आपण नगरपालिका अत्यंत व्यवस्थित हाताळल्याचा दावा वहाडणे यांनी केला.

नगरपरिषदेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही राजकिय खटपटी सुरू केलेल्या आहेत. असा आरोप वहाडणे यांनी शेवटी केला आहे .

Leave a Reply

You cannot copy content of this page