पैशाची देवाण घेवाण; माजी सैनिकाने रोखले, माजी नगरसेवकावर पिस्तूल

पैशाची देवाण घेवाण;

माजी सैनिकाने रोखले, माजी नगरसेवकावर पिस्तूल

कोपरगाव :

कोपरगाव येथे हॉटेलची उधारी मागितल्याने एका माजी सैनिकाने हॉटेल मालकाला दमदाटी करून पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माजी नगरसेवक विजय नारायण वडांगळे वय.(46 वर्षे) धंदा.व्यवसाय यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार माजी सैनिक आरोपी राजेश रामकृष्ण् जोशी रा.वडांगळे वस्ती
यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विजय वडांगळे हे (2 जुलै) रोजी दुपारी 4 वा.चे सुमारास पदमश्री डॉ. विठठलराव विखे पाटील नागरी सहकारी पतसंस्था कोपरगाव बसलेले होते आरोपी राजेश जोशी हा त्याचे कॅबीन मध्ये येवुन पिस्तूल काढून लोड केले. वडांगळे दिशेने रोखून तुझे उधारीचे पैसे दिलेले आहेत तरी तु परत परत पैसे का मागतोस असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. शिवीगाळ दमदाटी केली.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी जोशी याला अटक केली आहे. तक्रारीनुसार शहर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक नागरे हे अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page