नेहरू व भांगरे दोन्ही मार्केट दररोज सुरु , गर्दी आटोक्यात येत नसल्याने पालिका प्रशासनाचा निर्णय,

नेहरू व भांगरे दोन्ही मार्केट दररोज सुरु , गर्दी आटोक्यात येत नसल्याने पालिका प्रशासनाचा निर्णय,
मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची माहिती.
दररोज सकाळी ९ ते ५ ; शनिवार बंद

कोपरगाव :
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत (Dadar Vegetable market closed) आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, औषधं यासारख्या अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले. या सेवा 24 तास सुरु राहणार आहे. मात्र कोपरगाव शहरातील नेहरु भाजीपाला मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी आटोक्यात येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेहरू भाजी मार्केटच्या जोडीला आद्य क्रांतिकारक राधोजी भांगरे बाजार ओटे भाजीपाला मार्केट सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. अशी माहिती नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली आहे. या याबाबत पालिकेने पत्रक जारी केले आहे

पत्रकात म्हटले आहे की, शहराच्या बँक मार्गावर नेहरू भाजीपाला मार्केट आहे. या ठिकाणी अनेक कोपरगावकर नियमित भाजी खरेदी करताना दिसतात. नेहरू भाजी मार्केटची जागा अपुरी पडू लागल्याने सोशल डिस्टनसिंगचेही पालन होत नव्हते.अनेक भाजी विक्रेत्यांची व ग्राहकांचीही कुचंबणा होत होती.शिवाय गुरुद्वारा मार्गावर व बँक मार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहनांची पार्किंग करणेही अवघड झाले होते.

मात्र कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यासाठी या मार्केटचे दोन ठिकाणी विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. नेहरू मार्केट भांगरे मार्केट या दोन्ही ठिकाणीही दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भाजीपाला विक्री सुरू रहाणार आहे, तर शनिवारी जनता कर्फ्यू असल्याने दोन्ही भाजीपाला मार्केट बंद राहतील असेही मुख्याधिकारी सरोदे यांनी नगरपालिकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page