आ. आशुतोष काळेंच्या वेतनवाढ भूमिकेचे साखर कामगार सभेकडून स्वागत
वृत्तवेध ऑनलाईन।31ct2020
By:Rajendra Salkar, 16:30
By:Rajendra Salkar, 16:30
कोपरगाव : कर्मवीर शंकरराव कारखान्याच्या ६६ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभी चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी कामगारांना १८ टक्के दिवाळी बोनस व त्रिसदस्यीय समितीने साखर कामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय तातडीने घ्यावा अशी आग्रही भूमिका मांडली होती या भूमिकेचे कोपरगाव तालुका साखर कामगार सभेच्या वतीने स्वागत करून त्यांचा सत्कार केला आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक माजी खासदार शंकररावजी काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांनी साखर कारखान्यची धुरा सांभाळत असतांना नेहमीच ऊस उत्पादक शेतकरी व साखर कामगारांना केंद्रस्थानी ठेवले होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम व कामगारांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला देऊन शेतकरी व कामगारांप्रती उदात्त भावना जपली आहे. हाच वारसा कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी पुढे चालवत यावर्षी कोरोना संकट असतांना देखील साखर कामगारांना १८% बोनस देवून साखर कामगारांच्या वेतन वाढीबाबत आग्रही भूमिका घेतली. शासनाने नेमलेल्या त्रिपक्षीय कराराची मुदत संपली आहे. साखर कामगारांच्या वेतनाबाबत त्रिपक्षीय समितीने अजून ठोस निर्णय घेतलेला नाही. शासनाने त्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा आपण त्याची अंमलबजावणी करू असे जाहीरपणे सांगणारे ते राज्यातील सहकारी साखर कारखान्याचे एकमेव अध्यक्ष कोपरगांव तालुका साखर कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी नितीन गुरसळ यांनी सांगितले. याप्रसंगी कामगार प्रतिनिधी अरुण पानगव्हाणे, उपाध्याक्ष विक्रांत काळे, सेक्रेटरी प्रकाश आवारे, कायदेविषयक सल्लागार विरेंद्र जाधव, खजिनदार संजय वारुळे आदि उपस्थित होते.
.
Post Views:
600