दिवाळीची खरेदी शहरातील व्यापाऱ्याकडूनच करा – जनार्दन कदम
वृत्तवेध ऑनलाईन।31ct2020
By:Rajendra Salkar, 16:50
कोपरगाव- लॉकडाऊन काळात शहरातील व तालुक्यातील संपूर्ण उद्योगधंदे बाजारपेठ व छोटे मोठे व्यवसायावर परिणाम झाला शहरातील बाजारपेठ ठप्प झाली. तेंव्हा बाजारपेठ भक्कम करण्यासाठी दिवाळीची खरेदी शहरातील व्यापाऱ्याकडूनच करा, असे आवाहन नगरसेवक जनार्दन कदम यांनी केले.
लोकांचा व्यवसाय बंद असल्याने छोटे व्यावसायिक फळे, भाजी विक्रेते तसेच हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची जगण्यासाठी धडपड सुरु होती. या परिस्थितीत अनेक मजूर व हातावर पोट भरणारे कुटुंब यांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले होते. या दरम्यान कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशन, लायन्स क्लब व इतर सामाजिक संस्था यांनी लॉकडाऊन काळात सुमारे दोन महिने गरीब व गरजू लोकांना मोफत घरपोच जेवण व किराणा सामान पुरविण्याचे काम केले.
कोरोनाचे या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील व तालुक्यातील बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे.
तिला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांकडून दिवाळीची खरेदी करावी,