भाजप संपर्क कार्यालयात महर्षि वाल्मीकि जयंती साजरी
वृत्तवेध ऑनलाईन।31ct2020
By:Rajendra Salkar, 18:00
By:Rajendra Salkar, 18:00
कोपरगाव : महर्षि वाल्मीकि यांनी संस्कृतमध्ये रामायण या पवित्र ग्रंथाची रचना केली. त्रेता युगात महर्षि वाल्मीकि यांनी नारद मुनिकडून भगवान रामची कथा ऐकली असे मानले जाते. त्यानंतर महर्षींनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाकाव्य लिहिले. हिंदू दिनदर्शिकेनुसार, वाल्मिकी जयंती यावर्षी ३१ ऑक्टोबर रोजी अश्विन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते.
शनिवारी (३१) रोजी महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त कोपरगांव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार व महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सचिव सौ.स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा अनुसूचित जाती – जमातीचे जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे, कामगार जिल्हा संयोजक सतिष चव्हाण,भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले,अल्ताफ कुरेशी, भास्करराव पंडोरे, नारायण गवळी इ.मान्यवर हजर होते.