डॉ.तुषार व डॉ.काजल गलांडे यांची  क्षारसूत्र शस्त्रक्रिया यशस्वी ; रेक्टल पॉलीप आजाराच्या  मुलास  जीवदान 

डॉ.तुषार व डॉ.काजल गलांडे यांची  क्षारसूत्र शस्त्रक्रिया यशस्वी ; रेक्टल पॉलीप आजाराच्या  मुलास  जीवदान 

वृत्तवेध ऑनलाईन।1Nov2020
By:Rajendra Salkar, 15:00
डॉ. तुषार गलांडे अंकुश त्याची आई

कोपरगाव : कळवण तालुक्यातील कळवंद या गावातील रेक्टल पॉलीप आजाराने ग्रासलेल्या सहा वर्षाच्या अंकुश नावाच्या निरागस मुलाला साई ज्योती हॉस्पिटलचे डॉ.तुषार व डॉ. काजल गलांडे या दांम्पत्याने यशस्वी क्षारसूत्र शस्त्रक्रिया करून जीवदान दिले.

अंकुश याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली होती.अनेक ठिकाणी उपचार घेऊन ही उपयोग झाला नाही. त्याच्या पालकांनी साई ज्योती हॉस्पिटलमध्ये भरती करून डॉ.तुषार व डॉ काजल गलांडे यांना बाळाला होत असलेल्या त्रासाबद्दल सांगून तपासणी केली असता या अंकुशला रेक्टल पॉलीप हा आजार झालेला असल्याचे निष्पन्न झाले .या आजारामुळे त्याच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊन त्यास अशक्त पणा जाणवत होता.यावर तातडीने क्षारसूत्र केल्या शिवाय पर्याय नसल्याचे गलांडे यांनी अंकुशच्या नातेवाईकांना सांगितले असता त्यांनी देखील याची धास्ती घेतली. व अंकुशच्या जीवाचे काही झाले तर काय होणार असे म्हणत आपला धीर सोडला होता.
 मात्र गलांडे दांम्पत्यांनी त्यांना धीर देत अंकुशच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका न होता त्याची क्षारसूत्र करून त्याची या आजारातून सुटका करू असे आश्वस्त केले.व त्याप्रमाणे डॉ. तुषार व डॉ. काजल गलांडे यांनी या बाळावर क्षारसुत्र व तसेच अत्याधुनिक व्हेसल सिलर या मशिनद्वारे भूल देऊन रेक्टल पॉलीप या आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.भूल उतरल्यावरच अंकुश तीन तासांनी चालू -फिरू लागला व शौचाच्या वेळी होणारा रक्तस्राव व बाहेर येणारी गाठ निघून गेल्यामुळे बाळाला उत्तम असा फरक पडला, विशेष म्हणजे यासाठी अगोदरच ऍडमिट न करता कोणत्याही पद्धतीची कापाकापी व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया न करता वरील यशस्वी उपचार डॉ. गलांडे यांनी केले या कामात त्यांना डॉ.काजल गलांडे, व शिर्डी येथील भूल तज्ञ डॉ. कर्डीले यांची मोलाची साथ मिळाली.
डॉ तुषार व काजल गलांडे या दाम्पत्याच्या  या यशस्वी शस्त्रक्रियेची दखल घेत आमदार आशुतोष काळे,डॉ राजेश माळी, डॉ. अजय गर्जे,डॉ. संदीप मुरूमकर,डॉ बंडू शिंदे ,डॉ. महेश जाधव ,डॉ. मयूर जोर्वेकर,डॉ. नितीन झंवर आदींनी डॉ. गलांडे दांम्पत्याचे यांचे अभिनंदन केले आहे.
कोट – 
रेक्टल पॉलीप हा आजार हजार मुलामधून एखाद्या मुलाला होणार आजार आहे.हा आजार अतिशय गंभीर असून यामुळे शौचाच्या वेळी जास्त प्रमाणात रक्तस्राव होऊन बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. असे काही लक्षणे आढळल्यास त्यावर योग्य पद्धतीने त्वरित उपचार करावा. तसेच असे लक्षणे आढळणाऱ्यानी चॉकलेट, बिस्कीट व बेकरीचे पदार्थ खाण्याचे टाळावे.
– डॉ.तुषार गलांडे
कोट- 
रेक्टल पॉलीप या आजारामुळे अंकुशला असहाय्य वेदनांना सामोरे जावे लागत होते.यावर क्षारसुत्र व व्हेसल सिलर या पद्धतीमुळे गुदगत विकार ,मूळव्याध,भगंदर व फिशर यांवर खात्रीशीर व कोणताही धोका न होता उपचार होतात.त्यामुळे अश्या आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांनी कुठलेही दडपणन व भीती न बाळगता उपचार घ्यावे. – डॉ काजल गलांडे

Leave a Reply

You cannot copy content of this page