आधुनिक तंत्रज्ञानात रशिया व जर्मनीच्या विद्यापीठातही संजीवनी अव्वल -अमित कोल्हे

आधुनिक तंत्रज्ञानात रशिया व जर्मनीच्या विद्यापीठातही संजीवनी अव्वल -अमित कोल्हे

अर्पित बोरावके व हेमंत दुर्धवाले यांना १०० पैकी १०० गुण

कोपरगांवः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने रशियातील युरल फेडरल विद्यापीठाशी (युर्फू) परस्पर सामंजस्य करार केला असुन या विद्यापठाने टेक्निकल युनिव्हर्सिटी , बर्लिन (जर्मनी) व सिमेन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने घेतलेल्या ‘प्रकल्प आधारीत शिक्षण कार्यक्रम (प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग प्रोगाम)’ या एक आठवड्याच्या ऑनलाईन प्रशिक्षण उपक्रमात निवड चाचणीत यशस्वी झालेल्या संजीवनीच्या १५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षण कालावधी झाल्यानंतर घेण्यात आलेल्या परीक्षेत अर्पित संदिप बोरावके व हेमंत गोविंद दुर्धवाले यांनी १०० पैकी १०० गुण मिळवुन अवगत केलेले आधुनिक तंत्रज्ञान सिध्द करून रशिया व जर्मनीच्या विद्यापीठातही संजीवनी अव्वल असल्याचे सिध्द केले, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की बोरावके व दुर्धवाले यांचे सह ९ विद्यार्थ्यांनी ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. यात तोहिद अमिन शेख (९८), यफाई फाहद अब्दुलरब (९२), वैभव नारायण गमे (९२), कोमल शांताराम सुरादे (९२), भावेश प्रदिप केदारे (९०), हरप्रीत गुरमीत सिंग माथारू (९०), यांचा समावेश आहे. भूषण प्रकाश मोरे याने ८३ गुण मिळविले. तर आदित्य प्रभाकर धोत्रे, प्रणाली अशोक चौधरी , स्नेहल नामदेव चोबे, सोहम बाबासाहेब सुर्यवंशी व प्रज्वल बाबासाहेब काकडे यांना पास क्लास मिळाला. यात संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे १२ तर संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ३ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यातील काही विद्यार्थ्यांनी कॅड सिस्टिम अँड थ्रीडी माॅडेलिंग तर काहींनी सायबर सिक्युरीटी या प्रकाल्पांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणा दरम्यान या विद्यार्थ्यांनी रशिया व जर्मनीतील वि विद्यापीठातील प्राध्यापकांशी  ऑनलाईन संवाद साधुन संजीवनी मधुन मिळत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करून त्यांचीही वाहवा मिळविली.
संजीवनीचे विद्यार्थी हे जागतिक पातळीवरील स्पर्धाना सक्षम बनावे, आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात ते आघाडीवर असावे म्हणुन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने यापुर्वी युनिव्हर्सिटी ऑफ लेथब्रीज, कॅनडा, पोझनन युनिव्हर्सिटी , पोलंड, एन डब्ल्यु युनिव्हर्सिटी , सावुथ आफ्रिका व शेनकर काॅलेज ऑफ इजिनिअरींग, इस्त्राईल यांचेशी सामंजस्य करार केलेले आहेत. अलिकडच्या काळात रशियातील युरल फेडरल विद्यापीठाशी (युर्फू) परस्पर सामंजस्य करार केला आहे, त्या अंतर्गत विद्यार्थांना प्रकल्प आधारीत ऑनलाईन प्रशिक्षणाची संधी मिळाली. या विद्यार्थ्यांना प्राचार्य डी. एन. क्यातनवार, प्राचार्य ए. आर. मिरीकर यांचे सह डाॅ. महेंद्र गवळी व प्रा. इम्रान शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
रशिया आणि जर्मनी या प्रगत देशातील विद्यापीठांमध्ये संजीवनीच्या विद्यार्थ्यांचा शिरकाव होवुन तेथिल  प्राध्यापकांकडून  तसेच सिमेन्स या कंपनीकडूनही विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळविल्याबद्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री शंकरराव कोल्हे व कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले, असे श्री अमित कोल्हे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page